Shivraj Rakshe Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची पुणे महापालिकेत क्रीडा अधिकारी पदावर नियुक्ती!
पुणे – (The Karbhari News Service) – Shivraj Rakshe Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची पुणे महापालिकेत क्रीडा अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच राज्य सरकार कडून जारी करण्यात आले आहेत. (Shivraj Rakshe Maharashtra Kesari)
शिवराज राक्षे यांनी महाराष्ट्र केसरी हा ‘किताब जिंकला आहे. त्यानुसार त्यांना पुणे महापालिकेत क्रीडा अधिकारी या पदावर नियुक्त करण्याबाबत सरकारकडे अभिप्राय सादर करण्यात आला होता. पुणे महापालिकेत क्रीडा अधिकारी ची दोन पदे आहेत. एक पद हे पदोन्नती ने भरले जाते. तर दुसरे पद हे नामनिर्देशित असते. यातील पदोन्नती ने भरण्याचे पद भरलेले आहे. दुसरे नामनिर्देशित पद रिक्त आहे. त्यानुसार राक्षे यांची नियुक्ती केली जाणार आहे. (PMC Sport Officer)
सरकारकडे याबाबत अभिप्राय सादर केल्यानंतर क्रीडा अधिकारी पदासाठी शैक्षणिक अर्हता शिथिल करण्याच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे उपसचिव प्रियांका कुलकर्णी – छापवाले यांनी महापालिका आयुक्तांना राक्षे यांना नियुक्त करून घेण्यास सांगितले आहे. तसेच याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.