PMC Security Department | पुणे महापालिका : 200 सुरक्षा रक्षकांना पॉक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण!
Pocso Act – (The Karbhari News Service) – बाल लैंगिक अत्याचार बाबत जनजागृती करण्यासाठी पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडील (Pune Municipal Corporation Security Department) 200 सुरक्षा रक्षक यांना पॉक्सो कायद्याबाबत (POCSO Act) शनिवार रोजी प्रशिक्षण देण्यात आले. अशी माहिती सुरक्षा अधिकारी राकेश विटकर (Rakesh Vitkar PMC) यांनी दिली. (Pune PMC News)
सुरक्षा विभागाकडील सुरक्षा रक्षक हे त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी २४x७ प्रमाणे कामकाज करीत असतात. सुरक्षा रक्षक हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वात प्रथम प्रतिसाद देऊ शकतात. अलीकडच्या कालखंडात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यत्वे शाळेच्या ठिकाणी बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसत आहे. याच संदर्भात शहरात कार्यरत असलेली NGO “फौंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन-मुस्कान संस्था” पुणे आणि आसपासच्या भागातील शाळामध्ये लहान मुलांशी लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर प्रचार आणि जागृती निर्माण करण्यासाठी काम करत आहे. त्याअनुषंगाने बाल लैंगिक अत्याचार व पोक्सो कायदा (POCSO ACT ) याबाबत जनजागृती चर्चासत्र या विषयावर “फौंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन मुस्कान संस्था” या NGO चे प्रतिनिधी निशा कुलकर्णी आणि दिपाली दंडवते यांनी सुरक्षा विभागाकडे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
यावेळी सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांच्यासह सहायक सुरक्षा अधिकारी तसेच स्त्री आणि पुरुष सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
COMMENTS