PMC Schools | पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग आणि डिस्पोजल मशीन बसवणार!

Homeadministrative

PMC Schools | पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग आणि डिस्पोजल मशीन बसवणार!

Ganesh Kumar Mule Aug 05, 2026 8:23 PM

Pune Congress | पुणे काँग्रेस कमिटीकडून उमेदवारी अर्ज स्विकारण्यासाठी मुदत वाढ
Merged 32 Villages Property Tax | समाविष्ट गावांच्या मिळकत कर आकारणी बाबत निर्णय ठरला! | आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ३२ गावांची बैठक
Atal Pension Yojana New rule | अटल पेन्शन योजनेत मोठा बदल | हा नवा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल | जाणून घ्या काय परिणाम होईल

PMC Schools | पुणे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग आणि डिस्पोजल मशीन बसवणार!

| ऐन वेळी दाखल केलेल्या प्रस्तावाला मान्यता | महिला बाल कल्याण समितीचा मोठा निर्णय

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऐन वेळी दाखल केलेल्या प्रस्तावाला मान्यता देत शहरातील सर्व  शाळांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि सॅनिटरी पॅड डिस्पोजल म्हणजेच इन्सिनरेटर मशीन बसवण्याचा ठराव करण्यात आला आहे. (PMC Women and Child Welfare Committee)

नगरसेविका ऐश्वर्या सम्राट धोरात (Aishwarya Thorat BJP) आणि तन्वी प्रशांत दिवेकर  (Tanvi Divekar BJP) यांनी याबाबत प्रस्ताव मांडला होता.

प्रस्तावात म्हटले आहे की, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात आवश्यक स्वच्छता सुविधा उपलब्ध व्हाव्यात. त्यांचे आरोग्य, स्वच्छता आणि शालेय उपस्थिती सुधारावी तसेच सन्मानपूर्वक शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

समितीने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महापालिका शाळांमध्ये या मशीन तातडीने बसवण्यात याव्यात. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच मशीनची देखभाल, सॅनिटरी पॅडचा नियमित पुरवठा आणि मुलींमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षण विभागावर सोपवण्यात आली आहे.

या निर्णयामुळे महापालिका शाळांमधील मुलींना मासिक पाळीच्या काळात शाळेतून गैरहजर राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थिनींना अधिक आत्मविश्वासाने शाळेत येणे शक्य होणार आहे.

महिला व बाल कल्याण समितीच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक आणि सामाजिक संस्थांकडून स्वागत होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: