Marathi Bhasha Gaurav Din | “मराठी भाषेतील साहित्याचा समृद्ध ठेवा भारतातील व जगातील अनेक भाषांमध्ये अनुवादित व्हावा”: डॉ.वसंत गावडे

HomeBooks

Marathi Bhasha Gaurav Din | “मराठी भाषेतील साहित्याचा समृद्ध ठेवा भारतातील व जगातील अनेक भाषांमध्ये अनुवादित व्हावा”: डॉ.वसंत गावडे

Ganesh Kumar Mule Mar 04, 2026 9:24 PM

International Women’s Day : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; तोच खरा महिला दिन : डॉ प्राची सुतार  : ओतूरच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात जागतिक महिला दिना साजरा
International Ozone Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा
Marathi Bhasha Gaurav Din | युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे | प्रा डॉ. वसंत गावडे

Marathi Bhasha Gaurav Din | “मराठी भाषेतील साहित्याचा समृद्ध ठेवा भारतातील व जगातील अनेक भाषांमध्ये अनुवादित व्हावा”: डॉ.वसंत गावडे

Dr Vasant Gavde – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट व मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी दिली. (Pune News)

दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात १४ ते २८ जानेवारी २०२६ या दरम्यान भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ज्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्या स्पर्धांमधील प्रथम तीन क्रमांकाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविकात डॉ. रोहिणी मदने यांनी कार्यक्रमाची रूपरेषा,महत्त्व व उद्देश सांगितला. ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.निलेश हांडे मनोगतात म्हणाले,”आजच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथांचे वाचन करून महान व्यक्तींचे विचार समजून घेतले पाहिजेत. फक्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन न करता त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत.”

उपप्राचार्य डॉ.कल्याण सोनावणे म्हणाले, “आपण सर्वप्रथम आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो, नंतर इतर भाषांवर प्रेम करतो. कारण मराठी ही आपल्या आईची भाषा आहे.”
डॉ.वसंत गावडे म्हणाले,”मराठी भाषेचा वसा आणि वारसा महान आहे. मराठी भाषेला एक सांस्कृतिक वैभव आहे. मराठी भाषेतील साहित्याचा समृद्ध ठेवा भारतातील इतर भाषांमध्ये व जगातील अनेक भाषांमध्ये अनुवादित होणे गरजेचे आहे.”

डॉ.रमेश शिरसाट यांनी अध्यक्षीय भाषणात अपेक्षा व्यक्त केली,”आजच्या युवा पिढीने सकस व दर्जेदार साहित्य वाचावे, लिहावे. मराठी ही ज्ञान भाषा व्हावी.”
कार्यक्रमाचे औचित्य साधून”मराठी भाषा स्वाक्षरी मोहीम” राबविण्यात आली.

सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने कु.श्रद्धा अहिनवे हिने ‘मराठीची महती’ विषद केली.डॉ.आशुतोष ठाकरे,डॉ.राजेंद्र आंबवणे,डॉ.रमेश गोपाळे यांनी मराठी भाषेविषयीची आपली अभ्यासपूर्ण मांडणी केली. तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी डॉ. निलेश काळे, प्रा. अर्जुन मोध्ये जुन्नर तालुक्याचे मानवाधिकार अध्यक्ष मा.हेमंत पाटील, वरिष्ठ लिपिक श्री. रमेश गोसावी व श्री.निखिल काकडे उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी अर्णव बेनके याने मराठी भाषेचा गुणगौरव करणारी कविता सादर करत सूत्रसंचालन केले. आभार कु.कोमल नलावडे हिने मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: