PMC Road Departmetn | प्रकल्पांची नावे बदलून त्याच रस्त्यांची वारंवार दुरुस्ती कशासाठी? |  रस्त्याच्या कामाबद्दलची श्वेतपत्रिका काढण्याची माजी नगरसेवकांची पथ विभाग प्रमुखांकडे मागणी

Homeadministrative

 PMC Road Departmetn | प्रकल्पांची नावे बदलून त्याच रस्त्यांची वारंवार दुरुस्ती कशासाठी? |  रस्त्याच्या कामाबद्दलची श्वेतपत्रिका काढण्याची माजी नगरसेवकांची पथ विभाग प्रमुखांकडे मागणी

Ganesh Kumar Mule Sep 19, 2025 4:24 PM

Pune Road News | पुणे शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर काँग्रेस आक्रमक – पथविभागाने दिले तातडीच्या कारवाईचे आश्वासन
PMC Road Department | पथ विभागाकडे रुजू झालेल्या नवीन अभियंत्यांना रस्ता आणि प्रशासकीय कामकाजाबाबत प्रशिक्षण | पथ विभागाचा उपक्रम
Pune Grand Tour 2026 | पुणे महापलिका पथ विभागाचे पुणेकर नागरिकांना आवाहन

 PMC Road Departmetn | प्रकल्पांची नावे बदलून त्याच रस्त्यांची वारंवार दुरुस्ती कशासाठी? |  रस्त्याच्या कामाबद्दलची श्वेतपत्रिका काढण्याची माजी नगरसेवकांची पथ विभाग प्रमुखांकडे मागणी

 

PMC Road White Paper – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील रस्ते कामांबाबत गेल्या काही वर्षांपासून एक गंभीर प्रश्न नागरिकांसमोर आहे. नागरिकांच्या करातून कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्ते प्रश्न सुटण्याऐवजी तिच तिच कामे नावे बदलून पुन्हा पुन्हा केली जात आहेत, असा आरोप माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच रस्त्याच्या कामाबद्दलची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी महापालिका पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांच्याकडे केली आहे.  (Pune Municipal Corporation – PMC)

१. वारंवार दुरुस्ती व प्रकल्पांची नावे बदलणे : 2022-23 मध्ये २५० कोटींच्या पॅकेज कामांतून रस्ते दुरुस्ती झाली.

2023-24 मध्ये G-20 परिषद निमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्त करण्यात आले.

2024-25 व 2025-26 मध्ये ‘आदर्श रस्ते प्रकल्प’ या नावाखाली दोन वर्षांपासून प्रमुख 15 रस्त्यावर रोड फर्निचर व इतर कामे केली जात आहेत.

याशिवाय दरवर्षी मोबाईल व्हॅनद्वारे रिस्टेटमेंट व रोड मेंटेनन्ससाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. प्रश्न असा की, नावे बदलून तीच तीच कामे का केली जात आहेत? नागरिकांच्या पैशांचा अपव्यय थांबवणे आवश्यक आहे.

२. डांबर प्लांटचा उपयोग : महापालिकेचा स्वतःचा डांबर प्लांट वर्षभर चालू आहे, अगदी पावसाळ्यात सुद्धा. रोज सुमारे ४५० टन माल तयार होतो. हा माल १५ वॉर्ड ऑफिसमध्ये किती प्रमाणात दिला जातो व कोणत्या रस्त्यांवर वापरला जातो, याची माहिती आजपर्यंत पारदर्शकपणे देण्यात आलेली नाही.

३. पालिकेची यंत्रणा व कर्मचारी : महापालिकेच्या पथ कोठ्यांमध्ये आधीपासूनच कायम सेवक, बिगारी, शेवाळेवाले, रोलर, डंपर, पेव्हर उपलब्ध आहेत. मग अशी पूर्ण यंत्रणा असूनही पुन्हा पुन्हा बाहेरून ठेकेदारांना कामे देण्यासाठी नवीन टेंडर काढायची गरज का भासते? हे नागरिकांसाठी मोठे कोडे आहे.

माजी नगरसेवकांच्या  मागण्या :

1)2022 पासून आजवर झालेल्या रस्ते दुरुस्ती, रिस्टेटमेंट व आदर्श रस्ते प्रकल्पांतर्गत झालेल्या सर्व कामांची वर्षनिहाय व रस्त्यानिहाय सविस्तर माहिती प्रसिद्ध करावी.
2) डांबर प्लांटमधून रोज किती उत्पादन होते, ते किती व कुठे वापरले जाते, याची पारदर्शक नोंद व तपशील जाहीर करावा.
3) पथ कोठ्यांतील कर्मचारी व यंत्रणा प्रत्यक्षात किती काम करत आहेत, याचा ऑडिट अहवाल सादर करावा.
4) पुन्हा पुन्हा टेंडर काढून निधी खर्च करण्यामागे ठेकेदारधार्जिणी हेतू आहे का? याची चौकशी करून सत्य नागरिकांसमोर आणावे.
5) कुठल्या सल्लागाराने 145 कोटी रुपयांचे इस्टिमेट तयार केले त्या सल्लागारचे नाव.
6) ज्या अधिकाऱ्यांनी तयार केलेले इस्टिमेट तपासले त्या अधिकाऱ्याचे नाव.
7) सल्लागाराने सुचवलेले काम प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे हे बघितले असेल तर त्या अधिकाऱ्याचे नाव.
8) जी 20, अडीचशे कोटी रुपयाचे टेंडर यात या स्पर्धेच्या रस्त्याची किती कामे झाली आहेत हे तपासले आहे का.
9)प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी ठेवलेला निधी प्रत्यक्षात टेंडर मुख्य खाते काढते, त्या त्यात गेल्या तीन वर्षात केलेली कामे कोणती आहे त्याची यादी.
10) पुणे ग्रँड सायकल स्पर्धा ही अतिशय महत्त्वाची पुणे शहराचं नाव मोठं करणारी स्पर्धा आहे यात दुमत नाही. परंतु या स्पर्धेच्या नावावर सार्वजनिक निधीचा अपव्यय होणार नाही याची खाते प्रमुख म्हणून आपण खात्री करणे आवश्यक आहे.

त्यामुळे प्रशासकराज असताना रस्ते विभागाने जी कुठली काम केली त्या सर्व कामांची एक “श्वेतपत्रिका” तयार करावी अशी आमची मागणी आहे. आम्ही या “स्पर्धेच्या” मार्गावर “दुचाकी” वरून फिरून काय वस्तुस्थिती आहे हे पाहणार आहोत. नोव्हेंबर पूर्वी ही कामे संपवा असे पथ विभाग प्रमुखांचे वर्तमानपत्रातील विधान वाचले नोव्हेंबर पूर्वी ही कामे संपवा असे आपणास कोणी सांगितले त्याचे नाव. आमची मागणी सार्वजनिक पैशांचा अपव्यय थांबवण्यासाठी व पारदर्शक कारभारासाठी करण्यात येत आहे. असे माजी नगरसेवकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: