Pune Grand Tour 2026 | पुणे महापलिका पथ विभागाचे पुणेकर नागरिकांना आवाहन

Homeadministrative

Pune Grand Tour 2026 | पुणे महापलिका पथ विभागाचे पुणेकर नागरिकांना आवाहन

Ganesh Kumar Mule Oct 25, 2025 4:15 PM

PMC Road Department | पथ विभागाकडे रुजू झालेल्या नवीन अभियंत्यांना रस्ता आणि प्रशासकीय कामकाजाबाबत प्रशिक्षण | पथ विभागाचा उपक्रम
 PMC Road Departmetn | प्रकल्पांची नावे बदलून त्याच रस्त्यांची वारंवार दुरुस्ती कशासाठी? |  रस्त्याच्या कामाबद्दलची श्वेतपत्रिका काढण्याची माजी नगरसेवकांची पथ विभाग प्रमुखांकडे मागणी
Pune Road News | पुणे शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर काँग्रेस आक्रमक – पथविभागाने दिले तातडीच्या कारवाईचे आश्वासन

Pune Grand Tour 2026 | पुणे महापलिका पथ विभागाचे पुणेकर नागरिकांना आवाहन

 

Aniruddha Pawaskar PMC – (The Karbhari News Service) – पुणे शहरात जगतिक दर्जाची सायकल स्पर्धा होणार आहे. त्यासाठी स्पर्धेच्या मानांकन प्रमाणे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक रस्त्यांवर खरवडण्यात (milling) येत आहे. रस्ते खरवडून झाल्यानंतर त्यावर त्वरित डांबर काम करण्यात येत आहे. या रस्त्यांवरून वाहने चालवताना नागरिकांनी सुरक्षितपणे आणि जपून वाहने चालवावीत. असे आवाहन पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे. (PMC Road Department)

 

पुणे शहरामध्ये  १९ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या दरम्यान जागतिक दर्जाची सायकल स्पर्धा होणार आहे. यामध्ये देश विदेशातील अनेक सायकलपटू सहभागी होणार आहेत. पुणे शहरामध्ये एकूण ७५ किलोमीटर लांबी च्या रस्त्यांवर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे शहर सायकलिंगच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय नकाशावर जाणार आहे. या ७५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम पुणे महानगरपालिकेने नुकतेच हाती घेतलेले आहे. जागतिक सायकल स्पर्धेच्या मानकांप्रमाणे सदरचे रस्ते करणे गरजेचे आहे. यासाठी अनेक रस्त्यांवर खरवडण्यात (milling) येत आहे. रस्ते खरवडून झाल्यानंतर त्यावर त्वरित डांबर काम करण्यात येत आहे. या रस्त्यांवरून वाहने चालवताना नागरिकांनी सुरक्षितपणे आणि जपून वाहने चालवावीत. अत्यंत अल्पकाळासाठी नागरिकांना थोड्या असुविधांचा सामना करावा लागणार आहे. तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे पावसकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: