PMC Road Department | पथ विभाग प्रमुखांना ठेकेदारांबद्दल एवढा कळवळा का? माजी नगरसेवकांचा सवाल!

Homeadministrative

PMC Road Department | पथ विभाग प्रमुखांना ठेकेदारांबद्दल एवढा कळवळा का? माजी नगरसेवकांचा सवाल!

Ganesh Kumar Mule Sep 25, 2025 9:45 PM

G 20 in pune | G20 च्या निमित्ताने मागील ५ वर्षातील भाजपचे अपयश उघडे पडले |ओव्हर नाईट विकासाला आक्षेप | प्रशांत जगताप
Ward no. 2 | प्रभाग 2 मध्ये ग्रंथालय, अभ्यासिकासह सुसज्ज त्रिरत्न विहार योगा हॉल होणार | खासदार गिरीश बापट यांच्या फंडातून 25 लाखांची मंजूरी
PMC Recruitment Exam Results | अखेर पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर  ला कागदपत्रांची छाननी

PMC Road Department | पथ विभाग प्रमुखांना ठेकेदारांबद्दल एवढा कळवळा का? माजी नगरसेवकांचा सवाल!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – रस्त्याचे दोषदायित्व हे ठेकेदारांच्या कडे नाही असे पथ विभाग प्रमुख म्हणतात. खातेप्रमुखांनी महानगरपालिकेची बाजू मांडणी आवश्यक होते. मात्र खाते प्रमुखांनी कंत्राटदारांची बाजू का मांडली?  हा प्रश्न माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी महापलिका आयुक्त यांना विचारला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल संपूर्ण शहरांमध्ये चर्चा आहे. लोकभावना तीव्र आहे. त्यामुळे या विषयाकडे गंभीरपणे लक्ष द्यावे, असे माजी नगरसेवकांनी आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे कि, जेव्हा एखादा नवीन रस्ता तयार होतो किंवा केला जातो. त्यावेळेला त्या रस्त्यावर इतर खात्याचे काही प्रस्ताव आहेत का याची विचारणा संबंधित खाते प्रमुखांच्याकडे करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचे परिपत्रक  आयुक्त यांचे आहे. तीनशे कोटी रुपयाचे रस्ते पथविभागाने केले.
पथविभागाने केलेले रस्ते त्यांच्याच परवानगीने दोष दायित्व असताना तोडले गेले हे पाप गंभीर आणि जनतेच्या पैशाविषयी असणारी अनास्था आहे. रस्त्याचे दोषदायित्व हे ठेकेदारांच्या कडे नाही असे खाते प्रमुख जेव्हा म्हणतात तेव्हा वाईट वाटते.  दोषदायित्व देताना टेंडरच्या रकमेमध्ये वाढ करतो. मग हा निधी जनतेच्या करातून निर्माण झालेला आहे याचे भान अधिकाऱ्यांना नाही का असा स्वाभाविक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, खातेप्रमुखांनी महानगरपालिकेची बाजू मांडणी आवश्यक होते. खाते प्रमुखांनी कंत्राटदारांची बाजू का मांडली हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे.   जेव्हा आयुक्त म्हणतात की प्रत्येक खर्च तपासून आम्ही करू त्याच्या तिसऱ्या दिवशी खाते प्रमुख पत्रकार परिषद घेऊन 145 कोटीची कामे करणार असं ठामपणे सांगतात हे पुणे शहराच्या दुर्दैव आहे. या संपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये पुण्यामध्ये होणाऱ्या सायकल स्पर्धेला गालबोट लागू नये आणि जनतेचा पैसाही वाया जाऊ नये यासाठी मध्यम मार्ग  आयुक्त यांनी काढावा. अशी मागणी माजी  नगरसेवकांनी आयुक्त यांना केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: