PMC Retirement | युवराज देशमुख, वायदंडे, दिघे यांच्यासहित पुणे महापालिकेचे ८४ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retirement | युवराज देशमुख, वायदंडे, दिघे यांच्यासहित पुणे महापालिकेचे ८४ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Jul 01, 2025 1:37 PM

PMC Securty Department | कामगारांचे वेतन वेळेवर न दिल्याने सुरक्षा एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याचा सुरक्षा विभागाचा इशारा 
Courses for PMC Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना विविध अभ्यासक्रम करण्याची संधी! | वेतनवाढ आणि पदोन्नती साठी होणार फायदा!
PMC Employees Caste Validity | महापालिकेच्या २४७ कर्मचाऱ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रच प्रशासनाकडे सादर केले नाही!

PMC Retirement | युवराज देशमुख, वायदंडे, दिघे यांच्यासहित पुणे महापालिकेचे ८४ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – जून, 2025 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 84 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune News)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर जगताप, सेवानिवृत्त सल्लागार (कामगार), पुणे महानगरपालिका, युवराज देशमुख, मुख्य अभियंता, श्रीकांत वायदंडे, अधीक्षक अभियंता, मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी,  वर्षा कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, प्रमोद हुगे, कार्यकारी अभियंता हे उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना आजचे प्रमुख पाहुणे मा.जगताप साहेब यांनी सेवापूर्ती कार्यक्रमाची सुरुवात केल्याची बाब नमूद करून सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले. (Pune Municipal Corporation – PMC)

सेवानिवृत्त होणारे अधिकारी मंगेश दिघे, शैलेंद्र भालेराव,  लता मनोज टेकवडे यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले. तर सेवानिवृत्त होणाऱ्या सेविकेच्या मुलाने आपल्या आईप्रति कृतज्ञता व्यक्त करताना सुंदर गझल गाऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदकिशोर जगताप यांनी पुणे शहरासाठी आपण सर्वांनी दिवस रात्र मेहनत करून रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, दिवाबत्ती, आरोग्य, स्वच्छता इ. विविध सेवा पुरविल्या आहेत. याबद्दल आपणा सर्वांचे कौतुक आहे. सर्व सेवकांनी आपल्याला मिळणाऱ्या रकमेचे नियोजन करावे आपण सेवानिवृत्त होत असला तरी तुमची दुसरी इनिंग सुरू होत आहे. आपण नेहमी आनंदाने कामे केली पाहिजेत, कामात व्यस्त राहिले पाहिजे, कुटुंबाला वेळ दिला पाहिजे असे सूचित करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मनिषा कायटे यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: