Raja Dinkar Kelkar Museum | राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती, बावधनमध्ये उभारली जाणार म्युझियम सिटी

HomeBreaking News

Raja Dinkar Kelkar Museum | राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती, बावधनमध्ये उभारली जाणार म्युझियम सिटी

Ganesh Kumar Mule Jul 01, 2025 9:10 PM

Budget 2025 | पुणे शहराच्या प्रलंबित योजना व प्रकल्पांबाबत केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अंदाजपत्रकात २००० कोटी रुपयांची तरतूद करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
Ajit Pawar on Pune Metro | अजित पवार यांच्याकडून पुणे मेट्रोच्या भविष्यातील विस्तारित मार्गिकांचा आढावा!
Ajit Pawar on Pune Rain | शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश 

Raja Dinkar Kelkar Museum | राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती, बावधनमध्ये उभारली जाणार म्युझियम सिटी

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजा दिनकर केळकर संग्रहालय विस्तारावर उच्चस्तरीय बैठक

| बावधन येथील प्रस्तावित ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर हेच नाव राहणार

 

MLA Hemant Rasane – (The Karbhari News Service) – राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारित कामाला गती देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बावधन बुद्रुक येथील ६ एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणुकीसाठी प्रशासकीय समितीची स्थापना, सविस्तर आराखड्यानंतर निधीची तरतूद करणे, तसेच नव्याने उभारल्या जाणाऱ्या ‘म्युझियम सिटी’ला राजा दिनकर केळकर यांचेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे. (Ajit Pawar)

वैभवशाली इतिहासाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या केळकर संग्रहालयात ९ व्या शतकापासूनच्या २५,००० हून अधिक वस्तूंचा संग्रहीत ठेवा आहे. सध्या जागेअभावी केवळ १०% वस्तू सध्या जनतेसाठी खुल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संग्रहालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून यापूर्वीच बावधन बुद्रूक येथे ६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री  चंद्रकांत पाटील, आमदार  हेमंत रासने, सांस्कृतिक कार्य अपर मुख्य सचिव  विकास खरगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्तीय सुधारणा सचिव  शैला ए, वित्त व नियोजन सचिव  देशमुख, संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य  सुरेंद्र रानडे, वास्तुरचनाकार राजेंद्र रानडे, प्रशासकीय अधिकारी भारती न्याती तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी  जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर बोलताना हेमंत रासने म्हणाले, “नवीन संग्रहालयाचे बांधकाम दर्जेदार, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने व्हावे, अशी स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवकालीन, पेशवेकालीन आणि पुण्याच्या वैभवशाली वारशाच्या जतनासाठी माझा सतत प्रयत्न आहे. शनिवारवाड्यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. भविष्यात या ‘म्युझियम सिटी’ची ओळख जागतिक पातळीवर पोहोचेल, असा विश्वास आहे”.

संग्रहालयाचे संचालक  रानडे यांनी संग्रहालय निर्मितीची पार्श्वभूमी आणि त्याची वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, बावधन येथे प्रस्तावित असलेला ‘म्युझियम सिटी’ प्रकल्प हा केवळ एक संग्रहालय न राहता, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि पुणे शहराचा लौकिक जागतिक पातळीवर वाढवणारा एक पथदर्शी उपक्रम ठरेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: