PMC Retirement | ऑगस्ट महिन्यात पुणे महापालिकेचे 62 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retirement | ऑगस्ट महिन्यात पुणे महापालिकेचे 62 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Aug 31, 2025 2:16 PM

Rakshabandhan festival | PMPML | पीएमपीएमएल कडून रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांकरिता ५४ जादा बसेसचे नियोजन
Ahilyabai Holkar Jayanti | अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त ‘भाजयुमो’तर्फे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या ‘युवा प्रेरणा संवाद’
Malegaon Incident | तीन वर्षीय यज्ञा दुसाने मालेगाव अमानुष अत्याचाराची बळी | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे घटनेचा तीव्र निषेध

PMC Retirement | ऑगस्ट महिन्यात पुणे महापालिकेचे 62 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – ऑगस्ट, 2025 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 62 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माधव राजगुरू, कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, सदानंद शिंपी, महापालिका सहाय्यक आयुक्त हे उपस्थित होते. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले व सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त होणारे अधिकारी सदानंद शिंपी,  मोहिनी बाचल,  सिंधू बामणे यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माधव राजगुरू यांनी संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतून आपण कसे जगले पाहिजे याचा दृष्टांत सांगितला. तसेच सर्व सेवकांनी आपल्याला मिळणाऱ्या रकमेचे नियोजन करावे. आपण नेहमी आनंदाने कामे केली पाहिजेत, कामात व्यस्त राहिले पाहिजे, कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन केले पाहिजे असे सूचित करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कदम व नियोजन महेश मुंडलिक यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: