PMC Retirement | प्रसन्नराघव जोशी, डॉ.कल्पना बळीवंत यांच्यासह पुणे महापालिकेचे ५२ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retirement | प्रसन्नराघव जोशी, डॉ.कल्पना बळीवंत यांच्यासह पुणे महापालिकेचे ५२ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Feb 27, 2026 7:34 PM

PMC Employees Promotion | महापालिका कर्मचाऱ्यांना सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची संधी महापालिका आयुक्त देणार का? 
Savitribai Phule Jayanti | नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
PMC Solid Waste Management Department | महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त घनकचरा विभागाकडून स्वच्छता मशाल रैली, श्रमदान, प्लागेथोन चे आयोजन 

PMC Retirement | प्रसन्नराघव जोशी, डॉ.कल्पना बळीवंत यांच्यासह पुणे महापालिकेचे ५२ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) -फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 52 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ हास्य कवि बंडा जोशी, अधीक्षक अभियंता प्रसन्नराघव जोशी, उप आरोग्य अधिकारी, डॉ. कल्पना बळीवंत, जयंत पवार, अध्यक्ष, सेवानिवृत्त सेवक संघ, हे उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले व सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त होणारे अधिकारी प्रसन्नराघव जोशी, डॉ.कल्पना बळीवंत यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  बंडा जोशी यांनी सेवानिवृत्त सेवकांना त्यांच्या शैलीतून खळखळून हसविले व प्रत्येकाने कायम हसत रहावे, हसल्याने आपले आजार बरे होतात, हसताना व्यक्ती अधिक सुंदर व प्रसन्न दिसतो त्यामुळे जीवनात नेहमी हसतमुख रहा असा मोलाचा सल्ला देऊन सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी व आयोजन  महेश मुंडलिक यांनी केले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: