PMC Retired Employees | ऑगस्टमध्ये PMC चे ५९ कर्मचारी सेवानिवृत्त | कामगार कल्याण विभागाकडून सन्मान

Homeadministrative

PMC Retired Employees | ऑगस्टमध्ये PMC चे ५९ कर्मचारी सेवानिवृत्त | कामगार कल्याण विभागाकडून सन्मान

Ganesh Kumar Mule Sep 01, 2026 1:35 PM

PMC Kamgar Dindi | कामगार दिंडीत ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग | पुणे मनपाच्या वारीत समाज प्रबोधनाचे संदेश
PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा बुधवारी सन्मान
PMC Retirement July 2026 | पुणे महापालिकेचे 62 अधिकारी-कर्मचारी जुलैमध्ये सेवानिवृत्त!

PMC Retired Employees | ऑगस्टमध्ये PMC चे ५९ कर्मचारी सेवानिवृत्त | कामगार कल्याण विभागाकडून सन्मान

५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

 

PMC Retirement – (The Karbhari News Service) – ऑगस्ट २०२६ महिन्यात पुणे महानगरपालिकेतील ५९ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महापालिका कामगार कल्याण विभागाच्या वतीने सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. (PMC Labour Welfare Department)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. अनघा बालदोटा, मुख्य अभियंता जगदीश खानोरे, सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष जयंत पवार हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांनी केली. त्यांनी सेवापूर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक आणि नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकाला काही अडचण आल्यास कामगार कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त होणारे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, उप अभियंता मृण्मयी इनामदार, लिपिक टंकलेखक दत्तात्रेय हरपळे, सफाई सेवक नितीन चव्हाण यांनी महापालिकेतील सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत महापालिकेचे आभार मानले.

यावेळी दोन सेवानिवृत्त सेवक चंद्रकांत शेवरे आणि संजीवनी मुरकुटे यांच्या मुलांनी आपल्या आई-वडिलांबद्दल आणि महापालिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

प्रमुख पाहुण्या डॉ. अनघा बालदोटा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महापालिकेला प्रदीर्घ सेवा दिली आहे. तुम्ही सर्वजण या शहराचा प्राण आहात. तुम्ही महापालिकेकडून आपले संचित घेऊन जात आहात. आपली आयुष्याची पुंजी व्यवस्थित सांभाळा, बकेट लिस्ट पूर्ण करा, स्वतःसाठी जगा आणि आरोग्याची काळजी घ्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व ५९ सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शॉल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले, तर आयोजन अमित चव्हाण आणि महेश मुंडलिक यांनी केले होते.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: