PMC Retired Employee | सेवानिवृत्त कर्मचाऱ्या बाबत महापालिका प्रशासनाचे महत्वाचे आदेश!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांच्या बाबतीत सेवानिवृत्तीच्या दोन महिने अगोदर संबंधीत सेवकाची पूर संचय निधीची वर्गणी व कर्जफेड बंद करणे आवश्यक आहे. वयोपरत्वे सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकाचे प्रॉव्हीडंट फंडाच्या अंतिम देय रकमेचे प्रकरण सेवकाचे सेवानिवृतीचे महिन्याचे पहिल्या आठवड्यात पुरसंचय निधी विभागाकडे सेवानिवृत्तीचे आज्ञापत्रक जोडून पाठविणे आवश्यक आहे. संबंधित सेवकाचे सेवापुस्तक हे सेवानिवृत्तीचे महिन्याच्या २० तारखेपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. यासाठी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
तसेच मयत व ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेले सेवकांबाबत पूरसंचय निधीचा अंतिम हिशोब करणे आवश्यक आहे. सबब सर्व खातेप्रमुख यांनी आपले स्वाक्षरीने आपल्या खात्याकडील सेवानिवृत्त सेवकाचे प्रॉव्हीडंट फंडाच्या अंतिम देय रकमेचे प्रकरण स्वेच्छा निवृत्तीचे आज्ञापत्रक जोडून पुरसंचय निधी विभागाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी.
सदरचे प्रकरण पुरसंचय निधी विभागाकडे पाठविल्यानंतर २० दिवसाचे आत सदर सेवकाचे सेवापुस्तक पाठविणे आवश्यक आहे. (यासाठी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही.) जेणेकरून सदर सेवकाची पुरसंचय निधीची अंतिम देयकाची रक्कम त्यांना वेळेत प्राप्त होणे शक्य होईल. मयत सेवकांच्या बाबतीत मुळ मृत्यू दाखला प्रकरणी समाविष्ट करणे आवश्यक आहे. तसेच मयत सेवकाचे बाबतीत संबंधित मयत सेवकाचे वारसाबाबत न्यायालयात कोणताही वारसवाद प्रलंबित आहे अगर कसे? याची खातरजमा केल्यानंतरच प्रॉव्हीडंट फंडाच्या अंतिम बिलाचे रक्कम मिळणेबाबत प्रकरण पूरसंचय निधी विभागाकडे सादर करण्यात यावे. याबाबत काही वाद अथवा कायदेशीर बाब निर्माण झाल्यास त्यास संबंधित खाते जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
१) यापूर्वी ज्या सेवकांना प्रॉव्हीडंट फंडाचे क्रमांक प्राप्त झालेले आहेत, परंतु ज्यांनी नॉमिनेशन फॉर्म भरलेले नाही, अशा सेवकांनी नॉमिनेशन फॉर्म भरून त्यावर स्वतःची तसेच खातेप्रमुखांची स्वाक्षरी घेवून प्रॉव्हीडंट फंड विभागाकडे जमा करण्याची दक्षता घ्यावी. भविष्यात संबंधीत सेवकांच्या नॉमिनेशन बाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास जबाबदारी संबंधीत सेवकाची राहील.
२) पूरसंचय निधी विभागाकडील कर्ज वाटपाचे काम दि. ०१-०४-२५ ते दि. ३०-०४-२५ अखेर वार्षिक व्याजाच्या हिशोबासाठी बंद ठेवावयाचे असल्याने दि. २६-०३-२०२५ अखेर प्राप्त झालेल्या सेवकांचे कर्जाचे अर्ज मंजूर केले जातील. त्यानंतर कर्जाबाबत अर्ज स्वीकारले जाणार नाही. तसेच या कालावधीत पूरसंचय निधीबाबत कोणत्याही स्वरुपाची माहिती दिली जाणार नाही.
३) सेवानिवृत्त सेवकांचे चेक सेवापुस्तकात नोंदविल्यावर त्वरित सेवापुस्तक घेवून जाण्याची जबाबदारी संबंधीत पगारबिल लेखानिकांची राहील.
(४) अंशदायी सेवानिवृत्त योजना (सी.पी.एस.) लागू झालेल्या सेवकांपैकी ज्या सेवकांनी त्यांचे प्रॉव्हीडंट फंडाचे खात्यातील रक्कम घेतलेली नसेल, अशा सेवकांनी त्यांच्या खात्यातील रक्कम परत मिळणे व खाते बंद करण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज खात्यामार्फत सादर करावेत.
हे परिपत्रक आपले अधिनस्त सर्व अधिकारी, कर्मचारी व बिल लेखनिक यांचे निदर्शनास आणून देणेची जबाबदारी खातेप्रमुख/ विभागप्रमुख यांची राहील. असे देखील परिपत्रकात म्हटले आहे.
COMMENTS