PMC Ranking | PMC Pune Health Schemes | आरोग्य योजनांमध्ये पुणे महापालिकेची रँकिंग 4 थ्या वरून 3 ऱ्या स्थानावर
| आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे रँकिंग मध्ये सुधारणा
PMC Ranking | PMC Pune Health Schemes | केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजनांचा (Central and State governments health schemes) पुणेकरांना लाभ देण्यासाठी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने या योजनांची अंमलबजावणी केली जाते. 2006- 2007 सालापासून या योजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तेव्हापासून 2022 पर्यंत राज्यात नेहमी पुणे महापालिकेची रँकिंग (Low Ranking) खाली होती. ही रँकिंग शेवटच्या 5 क्रमांकात असायची. मात्र 2022 सालात पुणे महापालिकेने (PMC Pune) योजना राबवण्यात घेतलेल्या आघाडीने आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांच्या प्रयत्नाने या रँकिंग मध्ये सुधारणा होऊन 4 थ्या क्रमांकावर रँकिंग आली. त्यानंतर आता 2023 मध्ये यात अजून सुधारणा होऊन ही रँकिंग 3 ऱ्या स्थानावर आली आहे. याबाबत राज्य सरकारनेही पुणे महापालिकेचे कौतुक केले आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव (Assistant Health officer Dr Vaishali Jadhav) यांनी दिली. (PMC Pune health schemes : PMC Ranking)
पुणे महापालिकेच्या वतीने (Pune Municipal Corporation) केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजना राबवण्यात येतात. यात विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचा समावेश असतो. यामध्ये खासकरून RCH (Reproductive And Child Health) आणि NUHM (National Urban Health Mission) योजनांचा समावेश आहे. यामध्ये RCH हे 2006-07 पासून तर NUHM हे 2016 पासून राबवण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र या योजना राबवण्याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग (PMC Pune Health Department) उदासीन दिसून आला. त्यामुळे महापालिकेची राज्यात रँकिंग ही नेहमी शेवटच्या पाच क्रमांकामधे राहिली. मात्र हा कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी जेव्हा सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांच्याकडे आली तेव्हा योजना अंमलबजावणी बाबत गती आली. शिवाय महापालिकेची रँकिंग देखील वाढली. (PMC Pune Health Department)
2023 मध्ये महापालिका पहिल्या 5 मध्ये असून रँकिंग तिसऱ्या स्थानावर आहे. पहिले स्थान नवी मुंबई, दुसरे कोल्हापूर तर तिसरे स्थान हे पुणे शहराचे आहे.
याबाबत सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांनी सांगितले कि, या योजना लोकांपर्यंत पोचवण्यात आणि त्यांना याचा लाभ देण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. यामध्ये रिक्त पदे भरण्यात आली. आशा वर्कर ची नियुक्ती केली. ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतिगृहे सुरु केली. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करत पुरुष नसबंदी चे कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच रिक्त पदावरील नर्सेस ची नियुक्ती करून शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. डॉ जाधव यांनी पुढे सांगितले कि, योजनेअंतर्गत केली जाणारे बरीच कामे बंद होती. ती आम्ही नव्याने सुरु केली. यामध्ये रुग्ण कल्याण समिती, महिला आरोग्य समितीची नियुक्ती करून यांचे काम सुरु केले. जे काही काळापासून बंद होते. यासाठी सरकार कडून फंड येतात. यामध्ये सुधारणा करण्यासाठी फंड चा वापर केला. (PMC Pune News)
डॉ जाधव यांनी सांगितले कि Nuhm आणि rch अशा दोन योजनांसाठी दरवर्षी जवळपास 29 कोटी निधी येतो. त्याचा विनियोग 85% च्या पुढे गेला आहे. या योजनांमध्ये पूर्वी महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आणि परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग नव्हता. त्यांनी आम्ही सहभाग केले. Supervision वाढवले. Zonal वॉर्ड साठी नर्सेस दिल्या. कामाचे सर्व स्तरावर विकेंद्रीकरण करून कामाला गती दिली. तसेच कर्मचारी आणि नर्स सोबत दर महिन्याला मिटिंग घेतली जाते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. (Pune Municipal Corporation News)
डॉ जाधव यांनी सांगितले कि अपुऱ्या सुविधेमुळे महापालिका रुग्णालयात रुग्ण येत नसत. जे येत ते ही ससून सारख्या रुग्णालयात निघून जात. यामध्ये गरोदर स्त्रियांचे प्रमाण जास्त होते. मग याची आम्ही कारणे शोधली. तशा सुविधा महापालिका दवाखान्यात देण्यास सुरुवात केली. नुकताच आम्ही गरोदर बायकांना सात्विक आहार देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या दवाखान्यांना रुग्णांची पसंती वाढली आहे. तसेच गरोदर मातांची तपासणी तज्ञ् डॉक्टर कडून करून घेतली या सगळ्याची दखल सरकार कडून घेण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेची रँकिंग सुधारली आहे. (Pune Mahanagarpalika Marathi batmya)
—