PMC Pune News | अनधिकृत इमारतीत सदनिका विकत घेऊ नका – पुणे महापालिका बांधकाम विभागाचे आवाहन | कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई
Pune PMC News – (The Karbhari News Service) – कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई साठी नियुक्त केलेल्या विशेष पथकामार्फत आज 29 रोजी कोंढवा खुर्द , शिवनेरी नगर गली नंबर 3 मध्ये दोन P+3 , व संत ज्ञानेश्वर नगर, काकडे वस्ती, s.no 5 मध्ये P+3 मजल्याच्या अशा तीन इमारत सुमारे 5500 चौ. फुट आर सी सी बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली.
सदर कारवाई साठी 6 बिगारी, 5 पोलीस, 1 jcb , 4 brekar, 2 गॅस cutter, 5 कनिष्ठ अभियंता, 2 उपअभियंता उपस्थित होते.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असे आवाहन पुणे महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS