PMC Proposals | ऐनवेळी  विषयपत्र दाखल करणाऱ्या खातेप्रमुखांना महापालिका आयुक्तांनी सुनावले!

Homeadministrative

PMC Proposals | ऐनवेळी  विषयपत्र दाखल करणाऱ्या खातेप्रमुखांना महापालिका आयुक्तांनी सुनावले!

Ganesh Kumar Mule May 04, 2026 8:35 PM

PMC Deep Clean Drive | डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून एकूण ९२ टन ओला कचरा, १३३ टन सुका कचरा, ८३७ टन राडारोडा व ७७ टन पालापाचोळा संकलित | महापालिका प्रशासनाचे सकारात्मक पाऊल
Swachh Survekshan Award | स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार क्रमवारीत पुण्याला देशात पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
PMP’s e-bus depot | पीएमपीच्या ई-बस डेपोचे शुक्रवारी उद्‌घाटन | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

PMC Proposals | ऐनवेळी  विषयपत्र दाखल करणाऱ्या खातेप्रमुखांना महापालिका आयुक्तांनी सुनावले!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका मुख्य सभेस व इतर समित्यांच्या सभेदरम्यान अनेक वेळा ऐनवेळी विषयपत्र विविध खात्यांकडून दाखल केली जातात. मात्र यावरून महापालिका आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांना सुनावले आहे. तसेच आगामी काळात ऐनवेळी प्रस्ताव आला तर दाखल केला जाणार नाही, असा इशारा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. (Naval Kishore Ram IAS)

 

मुख्य सभेस व इतर समित्यांच्या सभेदरम्यान अनेक वेळा ऐनवेळी विषयपत्र सादर केली जातात. त्यामुळे संबंधित विषयाबाबत पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे या  विषयांबाबत चर्चा करणे अडचणीचे होते. अपुऱ्या  माहितीमुळे एखादा निर्णय मनपा धोरणांशी तसेच शासन निर्णयांशी विसंगत होण्याची अथवा पुणे मनपाची आर्थिक हानी करणारा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच सर्व खातेप्रमुख यांना एक नियमावली ठरवून दिली आहे.

अशी आहे नियमावली

१) कोणत्याही बैठकीत विषय समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव संबंधित विभागाने किमान १ दिवस आधी संबंधित  अतिरिक्त महापालिका आयुक्त  यांचेकडे सादर करणे बंधनकारक राहील.
२) अत्यंत तातडीचे व अपरिहार्य एखादे प्रकरण असल्यास संबंधित विभाग प्रमुखांनी संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्त  यांचेशी समक्ष चर्चा करावी व लेखी मान्यता घेऊनच तातडीचा आणि ऐनवेळचा प्रस्ताव सादर करावा.
३) या सूचनांचे पालन न झाल्यास तातडीचा तसेच ऐनवेळचा प्रस्ताव बैठकीच्या कार्यपत्रिकेमध्ये समाविष्ट केला जाणार नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: