PMC Property tax Department | महापालिका मिळकतकर विभागाची एकाच दिवशी 56 मिळकतीवर कारवाई | 1 कोटी 15 लाखाचा मिळकतकर वसूल

HomeपुणेBreaking News

PMC Property tax Department | महापालिका मिळकतकर विभागाची एकाच दिवशी 56 मिळकतीवर कारवाई | 1 कोटी 15 लाखाचा मिळकतकर वसूल

गणेश मुळे Mar 16, 2024 8:50 AM

PMC Sky Sign Department |  Mumbai Hoarding Collapse | PMC Commissioner’s order to take action on unauthorized advertisement boards
Madhav Jagtap PMC | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे परिमंडळ एक ची जबाबदारी | महापालिका आयुक्त यांनी जारी केले आदेश 
PMC Property tax Department | प्रशासन अधिकारी संजय शिवले यांना प्रॉपर्टी टॅक्स विभागातून केले कार्यमुक्त!

PMC Property tax Department | महापालिका मिळकतकर विभागाची एकाच दिवशी 56 मिळकतीवर कारवाई | 1 कोटी 15 लाखाचा मिळकतकर वसूल

PMC Property tax Department- (The Karbhari News Service) – पुणे महापालिका मिळकतकर विभागाकडून (Pune Municipal Corporation Property Tax Department) शहरात मिळकतकर न भरणाऱ्या व्यावसायिक मिळकतीवर (Commercial Property) जप्तीची कारवाई केली जात आहे. विभागाने शनिवारी शिवाजीनगर परिसरातील एकूण 56 मिळकतीवर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे संबंधित मिळकत मालकाने तात्काळ 1 कोटी 15 लाखाचा मिळकतकर जमा केला. अशी माहिती प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Property Tax)

मिळकतकर विभागाचे उप आयुक्त  माधव जगताप, महापालिका सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे , सहाय्यक आयुक्त मते, प्रशासन अधिकारी रविंद्र धावरे सर  व संजय शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ – झोन – २, मधील पेठ शिवाजीनगर येथील बिगर निवासी मिळकत “Palash Realtors LLP”  वर जप्ती कारवाई करण्यात आली. यात एकूण 56 मिळकती होत्या. जप्तीची कारवाई केल्यानंतर संबंधित मालकाने तात्काळ चेक आणून दिला. या कारवाईत पालिकेने  रु. १,१५,३७,२०३  वसूल केले आहेत.  विभागीय निरिक्षक – प्रकाश कुरतडकर व टिम आणि वसुली पथक यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.