PMC Properties Database |  महापालिकेच्या सर्व  मालमत्तांचे सर्वेक्षण करून एकत्रित डेटाबेस तयार केला जाणार

Homeadministrative

PMC Properties Database |  महापालिकेच्या सर्व  मालमत्तांचे सर्वेक्षण करून एकत्रित डेटाबेस तयार केला जाणार

Ganesh Kumar Mule Apr 22, 2026 8:18 PM

Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना
Lokmanya Tilak National Award | सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार!
Pune Road News | पुणे शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर काँग्रेस आक्रमक – पथविभागाने दिले तातडीच्या कारवाईचे आश्वासन

PMC Properties Database |  महापालिकेच्या सर्व  मालमत्तांचे सर्वेक्षण करून एकत्रित डेटाबेस तयार केला जाणार

| महापालिका अतिरक्त आयुक्तांनी सर्व विभागांचा घेतला आढावा

 

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमधील सर्व क्षेत्रीय कार्यालय तसेच पुणे महानगरपालिकेमधील विविध विभागाकडे ताब्यात असलेल्या मालमत्तांची २१ मुद्द्यांची माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे. याकरिता पुणे महानगरपालिकेकडील मालमत्ता जतन, संरक्षण, देखभाल, विनियोग, संचलन करणे करिता सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण करून एकत्रित डेटाबेस तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून सदर मालमत्तांचा प्रभावीपणे विनियोग करणे शक्य होणार आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. (Omprakash Divate PMC)

माहिती मध्ये मिळकतीचा वापर, क्षेत्रफळ सर्वे नंबर, भाडेपट्ट्याबाबतची स्थिती, करारनामा बाबतची स्थिती, अतिक्रमण विषयक स्थिती तसेच अक्षांश व रेखांश इत्यादी माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मालमत्तांची एकत्रित माहिती प्रणाली विकसित करण्याच्या अनुषंगाने आणि भाडेपट्टा व महसूल व्यवस्थापन यामधील त्रुटी दूर करण्याकरिता EMAMS प्रणाली लागू करण्याच्या अनुषंगाने तसेच मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली मध्ये मूलभूत सुधारणा करणे करीता संगणक आज्ञावली विकसित करणे बाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.  प्रणाली मध्ये सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण जीआयएस मॅपिंग, डिजिटायझेशन, मूल्यांकन, सिंगल विंडो प्लॅटफॉर्म, पेमेंट गेटवे, सिस्टीम मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंग करिता डॅशबोर्ड देखील विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सदर प्रणाली विकसित झाल्यानंतर सर्व मालमत्तांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन प्रभावीपणे पुढील नियोजन करणे शक्य होणार आहे.

या प्रसंगी  सह महापालिका आयुक्त (उद्यान विभाग) डॉ. अशोक घोरपडे, तुषार बाबर (उपआयुक्त – माहिती व जनसंपर्क विभाग),  आशा राऊत (उपआयुक्त – क्रिडा विभाग),  निखील मोरे (उपआयुक्त – परिमंडळ क्र. ५) तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयांचे महापालिका सहायक आयुक्त तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: