Pune PMC News | नगरसेविकांच्या परिवाराचा प्रशासनात हस्तक्षेप | रुपाली पाटील, संगीता तिवारी यांच्याकडून आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी 

Homeadministrative

Pune PMC News | नगरसेविकांच्या परिवाराचा प्रशासनात हस्तक्षेप | रुपाली पाटील, संगीता तिवारी यांच्याकडून आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी 

Ganesh Kumar Mule Apr 22, 2026 8:47 PM

PMC Name Policy | पुणे शहरात आता दोन छत्रपती शिवाजीनगर अस्तित्वात येणार?
Pune PMC News | नव्याने समाविष्ट गावांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित एलईडी पोल नको : प्रशासनाचा नकारात्मक अभिप्राय
Pune Municipal Corporation (PMC) – पुणे महापालिकेत Below टेंडर, Above भ्रष्टाचार!  | कामाचा दर्जा सुधारेल, पण… राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचे काय..! 

Pune PMC News | नगरसेविकांच्या परिवाराचा प्रशासनात हस्तक्षेप | रुपाली पाटील, संगीता तिवारी यांच्याकडून आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या कारभारामध्ये निवडून आलेल्या नगरसेविकांच्या पती, मुले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शासकीय कामकाजात सुरू असलेली बेकायदेशीर हस्तक्षेप आणि लुडबुड हा गंभीर मुद्दा बनला आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या नावावर घराणेशाही आणि अनधिकृत सत्ता चालवण्याचा प्रकार उघडपणे सुरू असून, हा प्रकार कायद्याचा आणि प्रशासनाचा सरळ अपमान आहे. (Pune News)

याच पार्श्वभूमीवर अँड.रूपाली पाटील ठोंबरे, संगीता तिवारी, Bitiya Foundation (बिटिया फाउंडेशन) आणि Jhansi Ki Rani Pratishthan (झाशीची राणी प्रतिष्ठान) यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन केवळ निषेध नसून, प्रशासनातील या बेकायदेशीर हस्तक्षेपाविरोधात थेट लढा आहे. आंदोलनानंतर संबंधित प्रतिनिधी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन अधिकृत निवेदन सादर करत  या प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या गंभीर आणि जनहिताच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी  पायल तिवारी बिटीया फौंडेशनच्या संगिता तिवारी आणि झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अँड.रूपाली पाटील‌ ठोंबरे यांनी आंदोलन केले यावेळी पुणे मनपाच्या आयुक्तांना निवेदन दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: