PMC Pension | सेवानिवृत्त सेवकांच्या पेन्शन आकारणीसाठी नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली!
| संगणक विभागाने केले प्रशिक्षणचे नियोजन
PMC IT Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांची पेन्शन प्रकरणे (PMC Employees Pension) त्वरित होऊन, सेवकाला लवकरात लवकर वेळेत पेन्शन चालू होणे आवश्यक आहे. तसेच सेवापुस्तकात विविध नोंदी नसल्याने आणि विविध कारणास्तव पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहतात. पेन्शन प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या दृष्टीने नवीन ऑनलाईन पेन्शन संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
नवीन ऑनलाईन पेन्शन संगणक प्रणालीचे प्रशिक्षण २८/०२/२०२५ रोजी, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी हॉल, पुणे मनपा मुख्य भवन), येथे आयोजित केले आहे. पुणे महानगरपालिकेतील सर्व संबंधित पेन्शन क्लार्क/ बिल क्लार्क यांनी सकाळी १०.०० ते दुपारी १.३० वा. या वेळेत प्रशिक्षण घेण्यास उपस्थित राहावे. असे आदेश संगणक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
प्रशिक्षणास संबंधित सेवकांनी उपस्थित राहण्याची जवाबदारी खातेप्रमुख यांनी घ्यावी व त्याप्रमाणे आपल्या अधिपत्याखालील संबधित सेवकांना सूचित करण्यात यावे. असे आदेशात म्हटले आहे.
COMMENTS