PMC Payroll Online System |  ऑनलाईन सेवानिवृत्ती संगणक प्रणालीचा वापर करण्याबाबत काही विभागांची उदासीनता | प्रणाली वापरण्याचे अतिररिक्त आयुक्तांचे आदेश

Homeadministrative

PMC Payroll Online System |  ऑनलाईन सेवानिवृत्ती संगणक प्रणालीचा वापर करण्याबाबत काही विभागांची उदासीनता | प्रणाली वापरण्याचे अतिररिक्त आयुक्तांचे आदेश

Ganesh Kumar Mule Feb 06, 2026 7:19 PM

Lift | महापालिकेचे क्लास वन अधिकारी लिफ्ट मध्ये पडले अडकून | अर्धा तासपर्यंत मदत मिळाली नाही 
PMC Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती | 10 मार्चपर्यंत निघणार जाहिरात
MLA Hemant Rasane | पुणे शहरात वाढत असलेल्या ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (GBS) च्या प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

PMC Payroll Online System |  ऑनलाईन सेवानिवृत्ती संगणक प्रणालीचा वापर करण्याबाबत काही विभागांची उदासीनता | प्रणाली वापरण्याचे अतिररिक्त आयुक्तांचे आदेश

 

PMC Retirement – (The Karbhari News Service) – पेन्शन प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या दृष्टीने नवीन ऑनलाईन पेन्शन संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेसाठी ऑनलाईन वेतन प्रणाली व ऑनलाईन सेवानिवृत्ती सेवक संगणक प्रणाली एकमेकांना जोडण्यात आलेल्या आहेत. परंतु ऑनलाईन सेवानिवृत्ती संगणक प्रणालीचा वापर काही ठराविक विभागांमार्फत केला जातो. काही विभागांमध्ये केला जात नाही असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रणालीचा वापर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सर्व विभागांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालीकेतसेवानिवृत्ती सेवक संगणक प्रणाली ही सन २००५ मध्ये विकसित करण्यात आलेली होती. सद्यस्थितीत सेवानिवृत्ती सेवक संगणक प्रणाली ही Standalone System होती. तसेच ती संगणकावर आधारित होती व ती संगणक प्रणाली कालबाह्य झालेली आहे. तद्नुषंगाने पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन सेवानिवृत्ती संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. ऑनलाईन सेवानिवृत्त संगणक प्रणालीमध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्या विभागाकडील पेन्शन क्लार्कने सेवानिवृत्त प्रकरण ऑनलाईन सेवानिवृत्ती संगणक प्रणालीमध्ये भरून ते पेन्शन विभागात तसेच मुख्यलेखापरीक्षक विभागाकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येते.

मुख्यलेखापरीक्षक यांच्या मार्फत अंतिम पेन्शन प्रकरणासाठीची मान्यता झाल्यानंतर पेन्शन विभागात प्रकरण पी.पी.ओ/एफ.पी.ओ. नंबर तयार होतो. तसेच काही कारणास्तव पेन्शन प्रकरणात अडचणी असल्यास त्याबाबतची माहिती त्वरित संबंधित विभागाकडील क्लार्क यांना दिसणार आहे. संबंधित खात्यातील क्लार्कने पेन्शन प्रकरणातील त्रुटीची पूर्तता करून पेन्शन विभागामार्फत मुख्यलेखापरीक्षकाकडे ऑनलाईन प्रणालीतून मान्यतेसाठी पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांची पेन्शन प्रकरणे त्वरित होऊन, सेवकाला लवकरात लवकर वेळेत पेन्शन चालू होणे आवश्यक आहे. तसेच सेवापुस्तकात विविध नोंदी नसल्याने आणि विविध कारणास्तव पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहतात. पेन्शन प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या दृष्टीने नवीन ऑनलाईन पेन्शन संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेसाठी ऑनलाईन वेतन प्रणाली व ऑनलाईन सेवानिवृत्ती सेवक संगणक प्रणाली एकमेकांना जोडण्यात आलेल्या आहेत. परंतु ऑनलाईन सेवानिवृत्ती संगणक प्रणालीचा वापर काही ठराविक विभागांमार्फत केला जातो. काही विभागांमध्ये केला जात नाही असे निदर्शनास आले आहे.

ऑनलाईन सेवानिवृत्त सेवकांना त्यांचे स्वत:च्या पेन्शन प्रकरणाची वेतननिश्चितीकरणाची स्थिती दिसणार आहे. ऑनलाईन सेवानिवृत्ती सेवक संगणक प्रणाली चा वापर केल्याने प्रशासकीय कामकाजात गतिमानता व पारदर्शकता वाढणार आहे. ऑनलाईन संगणक वापर केल्याने पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांची प्रकरणे त्वरीत / वेळेत होण्यास मदत होणार आहे. तसेच सेवानिवृत्त सेवकांना भविष्यात त्यांची सेवानिवृत्तीची माहिती व दर महिन्याला मिळणारी पेन्शन सेवक पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने बघता येणार आहे. तद्नुषंगाने पुणे महानगरपालिकेतील सर्व कार्यालयाने सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांची प्रकरणे payroll.pmc.gov.in या ऑनलाईन सेवानिवृत्ती संगणक प्रणालीची वापर करून अंमलबजावणी करण्यात यावी. असे अतिरिक्त आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: