PMC NUHM Employees | एनयूएचएम अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा दोन दिवसात होणार पगार | कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती 

Homeadministrative

PMC NUHM Employees | एनयूएचएम अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा दोन दिवसात होणार पगार | कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती 

Ganesh Kumar Mule Apr 28, 2025 8:53 PM

Shivsena Vs BJP | CAG | महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन
Bill checking work | वेतन लवकर करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही बिल तपासणीचे काम सुरु  | मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे आदेश 
Hirkani kaksh | महापालिका महिला कर्मचाऱ्यांविषयी मनपा प्रशासनाची अनास्था! | वर्षभरापासून हिरकणी कक्ष बंद | महिला आयोगाच्या पत्राची देखील दखल नाही

PMC NUHM Employees | एनयूएचएम अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा दोन दिवसात होणार पगार | कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती

PMC Health Deapartment – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्यातील एनयूएचएम, राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या डॉक्टर्स, सिस्टर्स, ब्रदर्स, फार्मासिस्ट यांचे गेले दोन महिन्यापासून वेतन थकीत आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 60 % व राज्य सरकार 40% निधी देते. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या अंतर्गत हे सर्व आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत. पुणे महापालिकेतही यांची संख्या सुमारे साडेचारशे ते पाचशे आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार राज्य सरकारने निधी दिला नसल्याने प्रलंबित आहेत. (Sunil Shinde RMS)

या संदर्भामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंदन यांची भेट घेऊन त्यांना राज्य शासनाचा निधी उपलब्ध होईपर्यंत महापालिकेचे निधी मधून पगार करावे. अशी विनंती केली. त्यांनी ती मान्य केली व लवकरच पगार करू असे सांगितले. या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये दोन महिने पगार नसल्यामुळे तीव्र असंतोष पसरला होता व त्याची परिणती आंदोलनामध्ये झाली. यावेळी कामगार नेते सुनील शिंदे यांनी महापालिका मध्ये ठिय्या मांडून बैठक मारली होती. त्यामुळे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन पुढील दोन दिवसांमध्ये पगार केला जाईल असे आश्वासन पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ नीना बोराडे व सहायक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक यांनी दिले. त्यावेळी हे आंदोलन थांबवण्यात आले. असे कामगार नेते सुनील शिंदे यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation – PMC)

या आंदोलनामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सरचिटणीस एस के पळसे, मेघमाला वाघमारे, लक्ष्मण मासाळ, प्रियंका भोपळे, कविता साळवे , गाडेकर, डॉ ऐश्वर्या मेहर, शिवकन्या हवा शितल मुंडे यांनी भाग घेतला.