PMC Merged Villages Drainage System | खडकवासला परिसरातील 16 समाविष्ट गावांची ड्रेनेजची समस्या सुटणार! | पहिल्या फेजमध्ये 581 कोटींचा प्रकल्प;  4 STP उभारले जाणार

HomeBreaking Newsपुणे

PMC Merged Villages Drainage System | खडकवासला परिसरातील 16 समाविष्ट गावांची ड्रेनेजची समस्या सुटणार! | पहिल्या फेजमध्ये 581 कोटींचा प्रकल्प; 4 STP उभारले जाणार

गणेश मुळे Jul 18, 2024 8:20 AM

PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदोन्नती | पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन! | 15 जुलै पर्यंत करता येणार अर्ज
PMC Pune Office Timing | कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करा नाहीतर कारवाईला सामोरे जा! | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इशारा
PMC Retired Employees | अमर शिंदे, सूर्यकांत जमदाडे यांच्यासहित महापालिकेचे ३० कर्मचारी सेवानिवृत्त!

PMC Merged Villages Drainage System | खडकवासला परिसरातील 16 समाविष्ट गावांची ड्रेनेजची समस्या सुटणार! | पहिल्या फेजमध्ये 581 कोटींचा प्रकल्प;  4 STP उभारले जाणार

PMC Drainage System- (The Karbhari News Service) – पुणे महापालिका हद्दीत (Pune Municipal Corporation Limits) समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी 16 गावांच्या ड्रेनेजची समस्या (PMC Merged Villages Drainage System) लवकरच सुटणार आहे. खडकवासला धरण परिसरातील (Khadakwasala Dam) ही गावे असल्याने धरणाचे देखील प्रदूषण कमी होणार आहे. पहिल्या फेजमध्ये या प्रकल्पासाठी 581 कोटींचा खर्च येणार आहे. अमृत योजनेतून (Amrut 2.0) हे काम केले जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला इस्टिमेट कमिटीने (PMC Estimate Committee) नुकतीच मान्यता दिली आहे. एकूण 23 गावांचा प्रकल्प हा 1438 कोटींचा आहे. अशी माहिती मलनिःस्सारण विभागाच्या (PMC Drainage Department) वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महापालिका हद्दीत 2021 साली 23 गावे समाविष्ट करण्यात आली. त्याआधी 2017 ला 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. मात्र या गावांत ड्रेनेज लाईनची कसलाही व्यवस्था नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना याचा खूप त्रास होतो. शिवाय यातील बरीचशी गावे खडकवासला धरण परिसरातील आहेत. त्यामुळे दूषित पाणी धरणात आणि नदीत सोडले जात होते. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेत मैलापाण्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान पुणे महापालिकेच्या मलनिःस्सारण विभागाने मागील वर्षी 24 गावांच्या ड्रेनेज लाईनचा प्रारूप आराखडा बनवून तो राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारच्या वतीने त्यात काही बदल सुचवण्यात आले होते. त्यानुसार नवीन 1438 कोटींचा आराखडा महापालिकेने बनवला. यामध्ये दोन फेज मध्ये  गावांत ड्रेनेज लाईन आणि मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बनवण्याचे अंतिम करण्यात आले. तसेच हा प्रकल्प अमृत योजने अंतर्गत करण्याचे ठरले. त्यानुसार याचे 581 कोटी इतके इस्टिमेट ठरवण्यात आले. अमृत अंतर्गत प्रकल्प रक्कम हिस्सा हा राज्य शासन 25% ,केंद्र शासन 25%व पुणे म. न.पा – 50 % इतका असणार आहे. इस्टिमेट कमिटीची मान्यता मिळाल्याने आता हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल. असे मलनिःस्सारण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
पहिल्या फेज मध्ये 16 गावांत ड्रेनेज व्यवस्था केली जाणार आहे.  या अंतर्गत ड्रेनेज लाईन या 193 km ची तर मुख्य ड्रेनेज लाईन ही 44km असणार आहे.

 चार  ठिकाणी STP केंद्र असणार

1.  म्हाळुंगे – 38 MLD
2. नांदेड – 20 MLD
3. पिसोळी – 14 MLD
4. गुजर निंबाळकर वाडी – 10 MLD
–  एकूण 82 MLD.

– ही असतील 16 गावे

सुस, महाळुंगे, नऱ्हे, पिसोळी, सणस नगर, कोंढवा धावडे, किरकिटवाडी, नांदोशी, खडकवासला, न्यू कोपरे, नांदेड, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी.