PMC Drainage Department | महापालिकेच्या मलनिःस्सारण विभागाचा असाही सावळा गोंधळ | काय झाले जाणून घ्या 

HomeपुणेBreaking News

PMC Drainage Department | महापालिकेच्या मलनिःस्सारण विभागाचा असाही सावळा गोंधळ | काय झाले जाणून घ्या 

गणेश मुळे Jun 15, 2024 2:25 PM

Pune Mahanagarpalika Shetkari Athvade Bajar | पुणे महापालिकेच्या 7 ओटा मार्केटमध्ये सुरु केले जाणार आठवडे बाजार
PMC Teachers Agitation | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांचे पुणे महापालिकेसमोर आमरण उपोषण
 PMC Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियान अंतर्गत  नदी स्वच्छता मोहिमेत 370 किलो सुका कचरा संकलित 

PMC Drainage Department | महापालिकेच्या मलनिःस्सारण विभागाचा असाही सावळा गोंधळ | काय झाले जाणून घ्या

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका  मलनिःसारण विभाग मार्फत खडक माळ आळी मुख्य रस्ता या ठिकाणची पावसाळी लाईन साफ करण्याचे काम सकाळी सुरु केले. मात्र ते काम अर्धवट सोडण्यात आले. शिवाय त्यातील राडारोडा रस्त्यावरच टाकण्यात आला. पाऊस आल्यावर तो राडारोडा संबंधित लाईनमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे केलेल्या कामाचा काहीच उपयोग होणार नाही. (Pune Municipal Corporation (PMC)
पावसाळी लाईन साफ करण्याचे काम सकाळी अकरा वाजता चालू करण्यात आले. साडेअकरा वाजता कामगार निघून गेले पुढील काम अर्धवट अवस्थेत ठेवून निघून गेले. रस्त्यावरच सर्व राडाराडा तसाच ठेवण्यात आलेला आहे . पाऊस आला तर हा राडा परत त्या लाईन मध्ये जाऊ शकतो. महापालिकेच्या मलनिःसारण विभागाचा हा सावळा गोंधळ समोर आल्याने काँग्रेस सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी महापालिकेकडे तक्रार केली.
एकीकडे आयुक्त म्हणतात कि नाले सफाई पूर्ण झाली. दुसरीकडे अशा पद्धतीने अर्धवट कामे केली जातात. याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी काम पूर्ण करतो असे सांगितले. मात्र दिवसभरात कुठलाही कामगार या कामाकडे फिरकला नाही.
ऋषिकेश बालगुडे, सरचिटणीस, काँग्रेस.