PMC Labour Welfare Department | अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला २५ लाखांची मदत | विमा योजना अंतर्गत देण्यात आली रक्कम 

Homeadministrative

PMC Labour Welfare Department | अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला २५ लाखांची मदत | विमा योजना अंतर्गत देण्यात आली रक्कम 

Ganesh Kumar Mule Feb 14, 2026 3:32 PM

Pune Ring Road | पुणे चक्राकार महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती
PMC Solid Waste Management Special Scod  Vehicle | PMC घनकचरा विभागाच्या ताफ्यात 4 स्पेशल स्कॉड व्हेईकल
Retired PMC employees | दोन वर्षांपासून सांगताहेत दोन दिवसांत प्रकरण मार्गी लागेल म्हणून!  | महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची व्यथा 

PMC Labour Welfare Department | अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला २५ लाखांची मदत | विमा योजना अंतर्गत देण्यात आली रक्कम

PMC Accident Insurance – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील मोटार वाहन विभागाकडील शिपाई सेवक कै. अनिल पुनलाल कांबळे यांचा ०१ एप्रिल २०२५ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. या सेवकाच्या वारस पत्नी  छाया अनिल कांबळे यांना शुक्रवार रोजी  २५ लाखाचा धनादेश पवनीत कौर (Pavneet Kaur IAS)  (अतिरिक्त महापालिका आयुक्त – जनरल) यांचे हस्ते देण्यात आला. यावेळी कामगार कल्याण विभागाचे खाते प्रमुख  नितीन केंजळे (मुख्य कामगार अधिकारी) हे उपस्थित होते. (PMC Chief Labour Officer Nitin Kenjale)

पुणे महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना  महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर सन २०१६ पासून पुणे महानगरपालिकेत राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत कामगार कल्याण विभागामार्फत आज अखेर २५ सेवकांना / वारसांना रक्कम रुपये २,७४,६०,०००/- रक्कम अदा करण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: