Pune Municipal Corporation (PMC) – ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम: पुणे महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक!

Homeadministrative

Pune Municipal Corporation (PMC) – ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम: पुणे महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक!

Ganesh Kumar Mule Mar 28, 2026 6:40 PM

Cabinet Meeting Decisions | मंत्रिमंडळ बैठक : एकूण निर्णय- 4 | जाणून घ्या सविस्तर
Maharashtra Cabinet Meeting | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय जाणून घ्या
 Pune Municipal Corporation appealed to the people of Pune to conduct a survey of the Maratha community and open category citizens  

Pune Municipal Corporation (PMC) – ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम: पुणे महानगरपालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक!

 

PMC Pune – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री यांच्या १५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रामधील विविध कार्यालये यांच्यामध्ये प्रशासनात सुधारणा करण्याचा अनुषंगाने स्पर्धा घेण्यात आली. या मध्ये कार्यालयांची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, AI व Blockchainचा शासकीय कामकाजात वापर आणि GISचा कामात वापर अशा ७ सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली होती. सदर स्पर्धेअंतर्गत २९ महापालिकांच्या झालेल्या मूल्यमापनात पुणे महानगरपालिकेचा २०० पैकी १८६.२५ गुण मिळवून द्वितीय क्रमांक आला आहे. महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि  माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये  अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज)  पवनीत कौर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. (Pune PMC News)

१५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेने महापालिका आयुक्त  नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज)  पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट)  पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष)  ओमप्रकाश दिवटे यांच्या नेतृत्वामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन सेवा पोर्टल, तक्रारींचे विश्लेषण व व्यवस्थापन, व्हॉटसअॅप यांचा सेवा, तक्रार निवारण, माहिती उपलब्ध करून देणे यासाठी नागरिकाभिमुख वापर करण्यात येत आहे. पालिकेच्या वतीने AI व GIS आधारित प्रकल्पांचा व तंत्रज्ञानाचा विविध प्रकल्पांमध्ये वापर सुरु करण्यात आला आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेतील सर्व विभागामार्फत कामकाज करण्यात आले तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख  राहुल जगताप यांच्या विभागामार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेने मिळवलेल्या उज्ज्वल यशामुळे महापालिकेचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: