PMC JE Recruitment 2025 | पुणे महापालिका  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती | आतापर्यंत ३३०० उमेदवारांनी केले अर्ज 

Homeadministrative

PMC JE Recruitment 2025 | पुणे महापालिका  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती | आतापर्यंत ३३०० उमेदवारांनी केले अर्ज 

Ganesh Kumar Mule Oct 09, 2025 9:24 PM

Vyoshree scheme | केंद्राच्या वयोश्री योजनेचे बारामती मतदार संघात सर्वोत्तम काम – लोकसभेत कौतुक | याच योजनेसाठी निधी मात्र नाही; खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप
Shivsena UBT on PMC Election | शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग! | दत्त जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात
PMC Election 2026 | पुणे महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी  सुमारे २३,५००  अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती | मतदान केंद्रांची यादी २० डिसेंबर ला प्रसिद्ध करण्यात येणार

PMC JE Recruitment 2025 | पुणे महापालिका  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती | आतापर्यंत ३३०० उमेदवारांनी केले अर्ज

 

PMC Junior Engineer Recuritment – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) होण्याची संधी आली आहे. महापालिकेने १६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उमेदवार १ ऑक्टोबर पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची संधी  महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Pune Mahanagarpalika JE Bharti 2025)

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी ‘क’ मधील तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून https://www.pmc.gov.in/b/recruitment या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

दरम्यान गेल्या ८ दिवसात महापालिका प्रशासनाकडे एकूण ३३०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यातील १४०० उमेदवारांनी आपली नोंदणी करत आणि सगळी प्रक्रिया पूर्ण करत फी देखील भरली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान मागील जाहिराती वेळी २७८७९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज वैध धरण्यात आले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: