PMC JE Recruitment 2024 | 113 कनिष्ठ अभियंता (JE Civil) पदाच्या भरतीसाठी पुणे महापालिकेकडे 28924 अर्ज प्राप्त!
– 5 फेब्रुवारी होती शेवटची मुदत
PMC Junior Engineer Recruitment 2024 | पुणे महापालिकेत 113 कनिष्ठ अभियंता (JE Civil) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी 16 जानेवारी ते 5 फेब्रुवारी असा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत पुणे महापालिकेकडे 28924 अर्ज प्राप्त झाले आहेत. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation Recruitment 2024)
पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) तिसऱ्या टप्प्यातील भरती (PMC Recruitment 2024) प्रक्रिया सुरु केली आहे. आता 113 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याआधी पहिल्या टप्प्यात 448 तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. आता महापालिकेने तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) (स्थापत्य), यांचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाकडून याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाईट वर 16 जानेवारी म्हणजेच पासून उपलब्ध झाल्या होत्या. अर्ज सादर करण्याचा कालावधी 5 फेब्रुवारी पर्यंत देण्यात आला होता. त्या कालावधीत 28924 अर्ज प्राप्त झाले आहेत. याची आता प्रशासनाकडून पडताळणी करण्यात येईल. (Pune Mahanagarpalika Bharti 2024)