PMC IWMS System | पुणे महापालिकेची IWMS यंत्रणा खिळखिळी! | ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना रात्री 3 वाजेपर्यंत महापालिकेत ठोकावा लागला मुक्काम

HomeBreaking Newsपुणे

PMC IWMS System | पुणे महापालिकेची IWMS यंत्रणा खिळखिळी! | ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना रात्री 3 वाजेपर्यंत महापालिकेत ठोकावा लागला मुक्काम

गणेश मुळे Mar 29, 2024 8:29 AM

Water problem of Baner-Balewadi-Sus-Mhalunge | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे गावच्या पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांनी केली बालेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी व नागरीकांशी चर्चा..!
LED fittings | PMC | महापालिका घेणार 27500 LED फिटिंग!  | 20 कोटीपर्यंतच्या खर्चाला इस्टिमेट कमिटीची मान्यता 
Manjari Water Project | मांजरी पाणी पुरवठा योजना पुणे महापालिकेकडे होणार हस्तांतरित

PMC IWMS System | पुणे महापालिकेची IWMS यंत्रणा खिळखिळी!

| ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना रात्री 3 वाजेपर्यंत महापालिकेत ठोकावा लागला मुक्काम

PMC IWMS System – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation (PMC) अंदाजपत्रकिय तरतुदी नुसार विविध विभागांमार्फत प्रकल्पीय, भांडवलीय आणि महसुली कामे निविदा प्रक्रियेतून (Tender Process) केली जातात. या  विकास कामांकरिता आणि बिले सादर करण्यासाठी सुधारित संगणक प्रणाली (Intelligent Works Management System ) वापरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ही यंत्रणा खिळखिळी असल्याचे समोर आले आहे. कारण यंत्रणेतील त्रुटींचा महापालिका कर्मचारी आणि ठेकेदारांना फटका बसला. परिणामी या लोकांना गुरुवारी रात्री 3 वाजेपर्यंत महापालिकेत मुक्काम करावा लागला. या यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी ठेकेदार संघटनेकडून करण्यात आली आहे. (PMC IWMS System)

पुणे महानगरपालिकेतील (PMC Pune) विविध विभागामार्फत विकसित होणाऱ्या विकास कामांचे निविदा मान्यतेचे डॉकेट IWMS सॉफ्टवेअर मार्फतच करण्यात यावे. तसेच ऑडीट व दक्षता विभागाकरिता तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट पूर्णपणे भरणेची जबाबदारी ज्या विभागामार्फत डॉकेट मान्येतेसाठी सादर करण्यात येते त्या विभागातील संबधित कनिष्ठ अभियंता यांची राहील. असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune News)

तसेच सर्व विकास कामांचे पूर्वगणक पत्रक ( पु.ग.प.), जी. आय. एस. मॅपिंग, प्रशासकीय मान्यता, लाँकिंग, तांत्रिक मान्यता, डीटीपी, निविदा जाहिरात, ऑडीट व दक्षता विभागाकरिता तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट, निविदा मान्यतेचे डॉकेट, कार्यादेश (वर्क ऑर्डर) आणि मोजमापक पुस्तके ( एम. बी.) इत्यादी कामे IWMS सॉफ्टवेअर मार्फतच करण्यात यावे. असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले होते. त्यानुसार ही यंत्रणा काम करत आहे. मात्र यात त्रुटी असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेचे आर्थिक वर्ष रविवार ३१ मार्चला संपत आहे. परंतू शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार आणि रविवार साप्ताहित सुट्टया असल्याने गुरुवारी महापालिकेमध्ये कामांच्या बिलांसाठी ठेकेदारांनी (PMC Contractor) गर्दी केली होती. परंतू IWMS मधील तांत्रिक अडचणींमुळे ठेकेदारांसह कर्मचार्‍यांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

महापालिकेचे आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत आहे. अशातच गुरूवारी शेवटचा वर्कींग डे असल्याने मागील काही महिन्यांत महापालिकेची विविध कामे केलेले ठेकेदारांनी बिले सादर करण्यासाठी महापालिकेत गर्दी केली होती. यंदा प्रथमच महापालिकेने तयार केलेल्या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये म्हणजेच IWMS यंत्रणेत बिले सादर करायची असल्याने इंटरनेटमधील अडचणींमुळे व्यत्यय येत होता. तसेच सॉफ्टवेअरमध्येही काहीना काही तांत्रिक अडचणी येत होत्या. अशातच संध्याकाळी उशिरापर्यंत महापालिकेने कुठलिच मुदतवाढ न दिल्याने अनेकांना रात्री उशिरापर्यंत बिले सादर करण्यासाठी थांबून राहावे लागले. दरम्यान यंत्रणेतील त्रुटी तशाच आहेत. फक्त औपचारिक पद्धतीने बिले पूर्ण केली आहेत.

– IWMS यंत्रणेत या आढळल्या त्रुटी

1)  High speed internet लावले तरी IWMS चे काम खूप हळू होते
2) बिलांची रक्कम  मॅच होत नव्हती. रकमेत तफावत दिसून आली.
3) एकच computer operator होता.
4) अवघे एक Bill ची file पूर्ण करायला २ तास लागले.
5) M.B चे item एका क्रमवारीत आले नाही त्यामुळे त्याला rearrange करायला लागते.  त्यामुळे त्याला वेळ लागला.

महापालिकेची IWMS यंत्रणा योग्यच आहे. मात्र त्यातील काही त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. फक्त ठेकेदारच नाही तर महापालिका कर्मचाऱ्यांना देखील यात त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर कराव्या, अशी आमची महापालिका प्रशासनाकडे मागणी आहे. 

विशाल भोसले, अध्यक्ष, महापालिका ठेकेदार संघटना.