PMC Vidyawardhini School | पुणे महापालिकेच्या ‘विद्यावर्धिनी आदर्श शाळा’ उपक्रमासाठी प्रभाग दोन मधील आप्पासाहेब जाधव प्रशाळेची निवड

Homeadministrative

PMC Vidyawardhini School | पुणे महापालिकेच्या ‘विद्यावर्धिनी आदर्श शाळा’ उपक्रमासाठी प्रभाग दोन मधील आप्पासाहेब जाधव प्रशाळेची निवड

Ganesh Kumar Mule Feb 12, 2026 8:23 PM

Power Cut In Pune News | महावितरण अधिकाऱ्यांनो कारभार सुधारा अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढू
BARTI Pune Fellowship फेलोशिप बाबत बार्टीचा सकारात्मक प्रतिसाद ; पीएचडी धारकांचे आमरण उपोषण स्थगित
Stamp Duty | म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

PMC Vidyawardhini School | पुणे महापालिकेच्या ‘विद्यावर्धिनी आदर्श शाळा’ उपक्रमासाठी प्रभाग दोन मधील आप्पासाहेब जाधव प्रशाळेची निवड

– कला, भाषा, विज्ञान व संगीत दालनांसह सीएसआर निधीतून आधुनिक प्रयोगशाळा; ८१ वैज्ञानिक प्रयोगांची सुविधा

– नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते उद्घाटन

 

Nandini Dhende – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील शाळांमध्ये बौद्धिक विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने ‘विद्यावर्धिनी आदर्श शाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या शाळांमध्ये विविध विषयांवर आधारित दालने सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार येरवडा विभागातील प्रभाग क्रमांक दोनमधील नागपूर चाळ-फुलेनगर येथील आप्पासाहेब जाधव प्रशाळेची निवड करण्यात आली असून, येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दालनांचे उद्घाटन नवनिर्वाचित नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते पार पडले. (Pune News)

या उपक्रमात कला दालनाचा समावेश करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या चित्रकलेतील कौशल्याचे सादरीकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच उर्दू, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता यावे यासाठी स्वतंत्र भाषा दालन सुरू करण्यात आले आहे.

विज्ञान विषयाची गोडी वाढविण्यासाठी तिसऱ्या दालनात विज्ञान प्रयोगांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगरसेविका नंदिनी धेंडे यांनी प्रस्ताव मांडत या ठिकाणी वैज्ञानिक प्रयोगांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्याचा पुढाकार घेतला. सीएसआर निधीतून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार येरवडा विभागातील दोन शाळांमध्ये ही लॅब सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. आप्पासाहेब जाधव प्रशाळेसह एकूण चार शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ८१ विविध प्रयोग प्रत्यक्ष करून पाहण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय संगीत दालनाचीही स्थापना करण्यात आली असून, संगीताची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या शाळेची पटसंख्या वाढली असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नगरसेविका नंदिनी धेंडे आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी भविष्यातही शाळांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

—-

महापालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून या शाळेची केलेली निवड अतिशय योग्य आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

नंदिनी सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका. पुणे महापालिका


प्रभाग दोन मधील आप्पासाहेब जाधव प्रशाळा मधील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगात जिल्हा पातळीवर दुसरा क्रमांक मिळविला होता. तर मुख्यमंत्री आदर्श शाळेचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक शाळेला मिळाला आहे. यंदा ही शाळा राज्य पातळीवर गेली आहे. या शाळेतील मुलांना याचा नक्की फायदा होईल.

सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: