Mayor Manjusha Nagpure | नदीपात्रात राडारोडा टाकण्याच्या प्रकाराची महापौरांकडून गंभीर दखल |  महापौरांचे कारवाईचे आदेश

HomeBreaking News

Mayor Manjusha Nagpure | नदीपात्रात राडारोडा टाकण्याच्या प्रकाराची महापौरांकडून गंभीर दखल |  महापौरांचे कारवाईचे आदेश

Ganesh Kumar Mule Feb 12, 2026 8:44 PM

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भली मोठी यादी! | 20 लोकांची निवडणूक लढवण्याची इच्छा
Dr Siddharth Dhende |  परभणीतील शहीद भीम सैनिकाच्या मृत्यू प्रकरणी प्रभाग दोन मध्ये उत्स्फूर्त बंद | नागरिकांकडून नागपूर चाळ, समता नगर येथे स्वयंस्फूर्तीने पुकारला बंद
Swachha Survey 2024-25 | स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी: राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान!

Mayor Manjusha Nagpure | नदीपात्रात राडारोडा टाकण्याच्या प्रकाराची महापौरांकडून गंभीर दखल |  महापौरांचे कारवाईचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील नदीपात्रांमध्ये काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या राडारोडा, बांधकामातील मलवा व कचरा टाकण्याच्या घटना आढळून येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होणे, पूरस्थिती निर्माण होणे तसेच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल घेत महापौर मंजुषा नागपुरे यांनी कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.  (Pune Breaking News)

नदीपात्रात राडारोडा टिळक पुलाच्या शेजारी टाकण्यात आला आहे. हा प्रकार गंभीर आहे. राडारोडा टाकण्याच्या प्रकार रोखण्यासाठी २४ तास भरारी पथक नेमले होते ते पथक सध्या काय करत आहे? प्रशासनाचा हा ढिसाळपणामुळे शहर घाण होत आहे. त्यामुळे ज्या भागातून राडारोडा नदीपात्रात टाकण्यात आला तेथील संबंधित आरोग्य निरीक्षक बांधकाम निरीक्षक यांच्यावर जबाबदरी निश्चित करावी तसेच राडारोडा अथवा कोणत्याही प्रकारचा कचरा टाकणाऱ्या व्यक्ती, ठेकेदार किंवा संस्थांवर तात्काळ दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर शिक्षा करण्यात यावी. असे आदेश महापौरांनी दिले आहेत.

तसेच, यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व वॉर्ड ऑफिसर व संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नदीपात्रांची नियमित पाहणी करावी. संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ कारवाई करावी. गरज असल्यास सीसीटीव्ही, ड्रोन सर्व्हे तसेच विशेष पथक नेमूण नियंत्रण ठेवावे. असे देखील आदेश महापौर यांनी दिले आहेत.

नदी स्वच्छता व संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी देखील अशा प्रकारची माहिती संबंधित क्षेत्रिय कार्यालयास तात्काळ कळवावी, असे आवाहन महापौरांच्या वतीने  करण्यात आले  आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: