PMC Hospitals HMIS System | पुणे महापालिकेच्या 5 दवाखान्यात आता अत्याधुनिक संगणक प्रणाली | कामकाजात आणली जाणार गतिमानता! 

HomeBreaking Newsपुणे

PMC Hospitals HMIS System | पुणे महापालिकेच्या 5 दवाखान्यात आता अत्याधुनिक संगणक प्रणाली | कामकाजात आणली जाणार गतिमानता! 

गणेश मुळे Feb 20, 2024 12:40 PM

Dr Bhagwan Pawar Suspension | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार यांचे निलंबन! | राज्य सरकारकडून कारवाई 
PMC CHS Health Scheme | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या औषध बिलांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली
PMC Employees Health Check Up | महापालिका कर्मचाऱ्यांची आज मधुमेह, उच्च रक्तदाब व मुखकर्करोग ची तपासणी | आभा कार्ड आज आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढले जाणार

PMC Hospitals HMIS System | पुणे महापालिकेच्या 5 दवाखान्यात आता अत्याधुनिक संगणक प्रणाली | कामकाजात आणली जाणार गतिमानता!

PMC Hospitals HMIS System | पुणे महापालिकेच्या दवाखान्यात (Pune Municipal Corporation Hospital) आता अत्याधुनिक संगणक प्रणाली वापरली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर 5 दवाखान्यात ही प्रणाली सुरु केली जाणार आहे. यामुळे कामकाजात गतिमानता येणार आहे. शिवाय वेळ आणि मॅनपॉवर वाचून कामकाज पेपरलेस होणार आहे. अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार (PMC Health Officer Dr Bhagwan Pawar) यांनी दिली. (PMC Health Department)
याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून स्थायी समितीच्या (PMC Standing Committees) समोर मंजूरीसाठी ठेवला आहे. त्यानुसार महापालिकेच्या 5 दवाखान्यात HMIS संगणक प्रणाली चा वापर केला जाणार आहे. यामध्ये कमला नेहरू हॉस्पिटल (PMC Kamla Nehru Hospital), गाडीखाना (PMC Gadikhana), सुतार हॉस्पिटल (PMC Sutar Hospital), सोनवणे हॉस्पिटल (PMC Sonawane Hospital) आणि राजीव गांधी हॉस्पिटल (PMC Rajiv Gandhi Hospital) चा समावेश आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी स्मार्ट सिटी (Pune Smart City) चे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी संगणक साहित्याची खरेदी केली जाणार आहे. या संगणक साहित्यामध्ये 48 डेस्कटॉप, 22 लेजर प्रिंटर, 3 स्कॅनर, 3 बारकोड प्रिंटर आणि 14 टॅबलेट घेतले जाणार आहेत. त्यासाठी एकूण 80 लाख इतका खर्च येणार आहे. वर्गीकरणाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध केला जाणार आहे. (Pune PMC News)
डॉ पवार यांनी सांगितले कि महापालिकेच्या सर्वच दवाखान्यात ही प्रणाली लागू केली जाणार. पहिल्यांदा याची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर केली जाणार आहे. यात आम्ही 5 हॉस्पिटल निवडली आहेत. या संगणक प्रणालीमुळे वेळ आणि मॅनपॉवर वाचणार आहे. कारण सगळे व्यवस्थापन ऑनलाईन केले जाईल. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येईल. कर्मचाऱ्यांचे रिपोर्टींग देखील पूर्णपणे ऑनलाईन असेल.  डॉ पवार यांनी सांगितले कि एखादा नागरिक दवाखान्यात आल्यानंतर त्याचा केसपेपर पासून त्याची सर्व हिस्टरी संगणक प्रणालीत येणार आहे. याचा फायदा नागरिक आणि कर्मचाऱ्यांना होईल. कारण सर्व गोष्टी प्रणालीत येणार आहेत. यात वेळ वाचून कामकाजात गतिमानता येणार आहे. या 5 दवाखान्यातील स्थिती पाहून नंतर सर्व दवाखान्यात ही यंत्रणा लागू केली जाणार आहे.