PMC Health Department | डेंगू, चिकनगुनिया चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करायला हवे? पुणे महापालिकेने नागरिकांना सुचवल्या उपाययोजना!
Pune Municipal Corporation Health Department – (The Karbhari News Service) – पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यामध्ये विविध ठिकाणी स्वच्छ पाणी साठून राहते. त्यामुळे डेंगू (Dengue) व चिकनगुनिया (Chickengunya) या किटकजन्य रोगांच्या साथी उद्भवू शकतात. स्वच्छ पाण्यात डेंग्यू, चिकनगुनिया आजारांचा प्रसार करणारा ‘एडीस इजिप्ती’ (Aedes Aegypti) डासांची पैदास होते. त्यामुळे पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या (Health Department PMC) कीटक प्रतिबंधक विभागाने केले आहे. तसेच नागरिकांना काही उपाय योजना देखील सुचवल्या आहेत. (Pune PMC News)
पुणे महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने 15 क्षेत्रीय कार्यालयामार्फत डास उत्पत्ती शोधून ती नष्ट करण्याची मोहीम सुरु केली आहे. नागरिकांनी योग्य काळजी घेतल्यास कीटकजन्य आजारांचा प्रसार होणार नाही. तसेच डास उत्पत्ती करणारे नागरिक, व्यावसायिक, आस्थापना यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिके अधिनियमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर (Dr Surykant Devkar PMC) यांनी दिली.
काय उपाययोजना कराल?
- घरातील सर्व पाणीसाठ्यात आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी.
- शहराबाहेर जाताना नागरिकांनी घरातील सर्व पाणी साठे उदा. टाकी, ड्रम झाकून ठेवावेत.
- घर व टेरेस वरील भंगार व निरुपयोगी साहित्य काढून टाकणे.
- कुंडी, मनीप्लांट, फ्रीज व कूलच्या मागील ट्रे मध्ये साठलेले पाणी दररोज बदलणे.
- मोठे पाणीसाठे (हौद, कमळपॉड) येथे गप्पी मासे सोडणे
- सोसायटीच्या पार्किंगमधील पावसाळी जाळ्यामध्ये साठणारे पाणी वाहते करावे.
- आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा.
- बांधकाम व्यावसायिक, भंगार व कुंडीवाले व्यावसायिक, नारळ व शहाळेवाले व्यावसायिक यांनी त्यांचे येथे पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी.
- डेंग्यू, चिकनगुनियाचा प्रसार करणारा एडीस इजिप्ती डास दिवसा चावत असल्याने फिकट रंगाचे व लांब बाह्यांचे कपडे घालणे.
- घराच्या खिड्यांना जाळ्या बसवणे व झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे.
- व्हेट पाईपला जाळी बसवणे
- कीटजन्य आजाराच्या निदानासाठी रक्ताची तपासणी करतेवेळी हॉस्पिटल, प्रयोगशाळा यांना नागरिकांनी स्वत:चा अचूक पत्ता व फोन नंबर द्यावा.