PMC Health Department | झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया आजाराचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी विविध विभागांना नेमून दिली जबाबदारी

Homeadministrative

PMC Health Department | झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया आजाराचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी विविध विभागांना नेमून दिली जबाबदारी

Ganesh Kumar Mule May 28, 2025 11:48 AM

Ganesh Bidkar | PMC Pune | साथीच्या रोगांना नियंत्रणात आणा | गणेश बिडकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी! 
Swine Flu | PMC | शहरात स्वाईन फ्लू वेगाने पसरतोय  | ऑगस्ट च्या पहिल्याच आठवड्यात १५९ positive रुग्ण 
Dengue | Monsoon | आला पावसाळा… डेग्यूपासून स्वत:ला सांभाळा

PMC Health Department | झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया आजाराचा संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी विविध विभागांना नेमून दिली जबाबदारी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये (Pune Municipal Corporation Limit)  २०२४ मध्ये झिका आजाराचा (Zika Virus)  उद्रेक झाला होता. तसेच पावसाळ्यामध्ये डेंग्यू (Dengue), चिकुनगुनिया  अशा कीटकजन्य आजाराचा (Insect borne Disease) प्रसार होत असतो. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कीटकजन्य आजारांचा उद्रेक होऊ नये विविध कामे  पूर्ण करण्याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यायची आहे.  त्यानुषंगाने पारेषण (  जून ते माहे नोव्हेंबर ) कालावधीमध्ये  कामे करायची आहेत. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त (ज) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

१) किटक प्रतिबंध उपाययोजना | आरोग्य अधिकारी – १) डास उत्पत्ती शोध घेऊन नष्ट करणे. २)किटकजन्य आजाराचे निदान झालेल्या रुग्णाच्या परिसरात कीटक प्रतिबंधक उपायोजना राबविणे. ३)नागरिकांमध्ये जनजागरण मोहीम राबविणे.


२. अतिक्रमण कारवाई करणेबाबत करावयाची कामे – उपआयुक्त (अतिक्रमण विभाग ) – १) अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले साहित्यामध्ये पावसाचे पाणी साचून डास उत्पत्तीस कारणीभूत होणार नाही असे ठेवण्यात यावे. २) सार्वजनिक रस्त्यावर तसेच फूटपाथ येथे अनधिकृतरित्या टायर / पंक्चर व्यवसाय करणारे व्यवसायिक यांचेवर कारवाई करणे.

३. उप आयुक्त ( घनकचरा ) – १. सार्वजनिक रस्ते येथे टाकण्यात आलेले निरुपयोगी स्वच्छता मोहीम साहित्य उदा. थर्माकोल, नारळ करवंट्या यांची विल्हेवाट लावणे. २
२)घनकचरा व्यवस्थापनाच्या घंटागाड्यावर कीटक जन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजीबाबत ध्वनिफीत वाजविण्यात यावी.
३) आरोग्य निरीक्षक यांनी डासोत्पत्ती आढळणाऱ्या सोसायटी / घरे यांना दंड करण्याकरीता कीटक विभागास सहकार्य करावे तसेच आपल्या कार्यक्षेत्रात पावसाचे पाणी साठणार नाही याबाबत देखरेख करण्यात यावी. तसेच कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी परिसरात रिकामे डबे, टायर, निरुपयोगी कचरा इ. राहणार नाही याची दक्षता घेणे.

४. उद्यान- मुख्य उद्यान अधीक्षक –  १) पुणे महापालिकेच्या विविध उद्यानामध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या कारंजे येथे कीटक प्रतिबंधक विभागाकडून गप्पी मासे घेऊन त्याची पैदास करणे: २) उद्यानाच्या दर्शनी भागावर डेंग्यू जनजागरण बॅनर्स, स्टिकर्स लावावेत. ३)उद्यानामध्ये पावसाचे पाणी साठणार नाही याबाबत दक्षता घेणे.

५. पावसाळी जाळ्या व नाले सफाई – अधीक्षक अभियंता, ड्रेनेज विभाग – १) रस्त्यांवरील ड्रेनेज, पावसाळी लाईन्स / चेम्बर्स साफसफाई करणे व प्रवाह सुरळीत करणे. २)नाल्यांचा प्रवाह सुरळीत करणे.

—-

६) जलपर्णी – उप आयुक्त(पर्यावरण विभाग ) – मुळा मुठा नदीपात्र, मांजरी, होळकर पूल, म्हाळुंगे पाषाण तलाव येथील जलपर्णी निर्मुलन करणे.

७. अनधिकृत व्यावसायिक व बांधकामे | मुख्य अभियंता (बांधकाम) विभाग ) – १)सध्या चालू असलेल्या बांधकामांवर पाणी साठून डासो त्पत्ती होऊ नये याकरीता पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व निर्माणाधीन बांधकामांवर पाहणी करून बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या बांधकामावर पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करणे कामी आपले मार्फत सूचना देणे. २) खाजगी जागेत अनधिकृतपणे व्यवसाय करणारे भंगार व्यवसायिक, नर्सरी, मडकेवाले असे व्यावसायिक यांच्यावर कारवाई करणे.

—-

१०. प्रसिद्धी व प्रचार – माहिती व जनसंपर्क अधिकारी, पीमसी केयर सोशल मिडीया, आरोग्य अधिकारी – डेंगू चिकनगुनिया व शिका या आजारांना प्रतिबंध करणेकामी एडीस डांस निर्मुलनासाठी वृत्त पत्रामध्ये जाहीर प्रकटन प्रसिद्ध करणे. १) यामध्ये कोरडा दिवस पाळणेबाबत नागरिकांना आव्हान करणे. २) टेरेसवरील अडगळीचे साहित्य रिकाम्या रंगाचे डबे टायर इत्यादी वस्तू काडून टाकणे. ३) फुल झाडे, मनीप्लान्ट यांमध्ये पाणी साचून न देणे. ४) फ्रीज कुलर यांच्या मागे साठणारे पाणी कोरडे करणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: