PMC Health Department | काची रुग्णालयात डायग्नोस्टिक सेंटर आणि ह्रदयरोग निदान व उपचार केंद्र उभारले जाणार !
| ८ कोटींच्या खर्चाला मान्यता!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) डॉ.कोटणीस आरोग्य केंद्र (Dr Kotnis Health Centre) येथील कै.मालती काची रूग्णालय (Malti Kachi Hospital PMC) येथे डायग्नोस्टिक सेंटर आणि ह्रदयरोग निदान व उपचार केंद्र उभारले जाणार आहे. याबाबतच्या ८ कोटींच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात अली आहे. (Pune Municipal Corporation Health Department)
पुणे महानगरपालिकेच्या कै. मालती काची रूग्णालय येथे प्रसुतिविभाग व बाहयरूग्ण विभाग कार्यरत
आहे.परंतू काही कारणास्तव प्रसुतिविभाग बंद आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे १२००० चौ.फुट
आहे. तळ मजल्यावर डायग्नोस्टिक सेंटर आणि दुस-या व तीस-या मजल्यावर हृदयरोग निदान व उपचार केंद्र
उभारण्याचे प्रयोजन आहे. डॉ.कोटणीस आरोग्य केंद्र येथील कै.मालती काची रूग्णालय येथे डायग्नोस्टिक सेंटर आणि हृदयरोग निदान व उपचार केंद्र उभारण्याकरीता निधीची आवश्यकता होती. त्यानुसार वर्गीकरणच्या माध्यमातून हा निधी खर्च केला जाणार आहे.
२०२४-२५ चे अंदाजपत्रकात पुणे शहरामध्ये नव्याने cardiac centre उभारणे यासाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद या दोन कामांसाठी वळवली जाणार आहे. त्यानुसार पुणे महानगपालिकेच्या कै. मालती काची रूग्णालय येथे धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग निदान व उपचार केंद्र उभारणे यासाठी ६ कोटी आणि डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर उभारणे यासाठी २ कोटी खर्च केला जाणार आहे.
COMMENTS