PMC Health Department | काची रुग्णालयात डायग्नोस्टिक सेंटर आणि ह्रदयरोग निदान व उपचार केंद्र उभारले जाणार !   | ८ कोटींच्या खर्चाला  मान्यता!

Homeadministrative

PMC Health Department | काची रुग्णालयात डायग्नोस्टिक सेंटर आणि ह्रदयरोग निदान व उपचार केंद्र उभारले जाणार ! | ८ कोटींच्या खर्चाला मान्यता!

Ganesh Kumar Mule Jan 23, 2025 9:22 AM

PMC Commissioner Vikram Kumar | पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी पुणेकरांना केले हे आवाहन 
Kamala Nehru Hospital Dialysis Center | कमला नेहरू रुग्णालयातील डायलेसिस सेंटर चालवण्यास लायन्स क्लब असमर्थ!  | महापालिका आरोग्य विभागाने संस्थेकडून मागवला खुलासा 
PMC Pune Polio Vaccine Schedule | पुणे महापालिका कार्यक्षेत्रात पोलिओ लसीकरण मोहीम 9 मार्च पर्यंत चालणार 

PMC Health Department | काची रुग्णालयात डायग्नोस्टिक सेंटर आणि ह्रदयरोग निदान व उपचार केंद्र उभारले जाणार !

| ८ कोटींच्या खर्चाला मान्यता!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) डॉ.कोटणीस आरोग्य केंद्र (Dr Kotnis Health Centre) येथील कै.मालती काची रूग्णालय (Malti Kachi Hospital PMC) येथे डायग्नोस्टिक सेंटर आणि ह्रदयरोग निदान व उपचार केंद्र उभारले जाणार आहे. याबाबतच्या ८ कोटींच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्यात अली आहे. (Pune Municipal Corporation Health Department)

पुणे महानगरपालिकेच्या कै. मालती काची रूग्णालय येथे प्रसुतिविभाग व बाहयरूग्ण विभाग कार्यरत
आहे.परंतू काही कारणास्तव प्रसुतिविभाग बंद आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे १२००० चौ.फुट
आहे. तळ मजल्यावर डायग्नोस्टिक सेंटर आणि दुस-या व तीस-या मजल्यावर हृदयरोग निदान व उपचार केंद्र
उभारण्याचे प्रयोजन आहे. डॉ.कोटणीस आरोग्य केंद्र येथील कै.मालती काची रूग्णालय येथे डायग्नोस्टिक सेंटर आणि हृदयरोग निदान व उपचार केंद्र उभारण्याकरीता निधीची आवश्यकता होती. त्यानुसार वर्गीकरणच्या माध्यमातून हा निधी खर्च केला जाणार आहे.

२०२४-२५ चे अंदाजपत्रकात पुणे शहरामध्ये नव्याने cardiac centre उभारणे यासाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद या दोन कामांसाठी वळवली जाणार आहे. त्यानुसार पुणे महानगपालिकेच्या कै. मालती काची रूग्णालय येथे धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग निदान व उपचार केंद्र उभारणे यासाठी ६ कोटी आणि डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर उभारणे यासाठी २ कोटी खर्च केला जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0