Balasaheb Thackeray Jayanti | बाळासाहेबांनी सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

HomeBreaking News

Balasaheb Thackeray Jayanti | बाळासाहेबांनी सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

Ganesh Kumar Mule Jan 23, 2025 2:53 PM

Hadapsar Devlopment Works | हडपसर आणि महंमदवाडी परिसरात विविध विकास कामांचे उदघाटन | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांचे विशेष प्रयत्न
PMC Pune new Villages | समाविष्ट 34 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारचे आदेश 
Pramod Nana Bhagire | रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करून सांस्कृतिक राजधानीवर लागलेला डाग कायमचा पुसून टाका | प्रमोद नाना भानगिरे

Balasaheb Thackeray Jayanti | बाळासाहेबांनी सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

 

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आणि सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरणा घेत, समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले जात आहेत असे प्रतिपादन पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire Shivsena) यांनी केले. (Pune News)

 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने सारसबाग जवळील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे येथील कलादालन येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पुणे शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पुणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या उपक्रमाद्वारे शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे यांचे तेजस्वी नेतृत्व, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी दिलेला आवाज, मराठी माणसांसाठी असलेला लढा महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद तसेच हिंदुत्वासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरणा घेत, समाजहिताचे अनेक उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबवले जात असून त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा अविरतपणे पुढे चालवत राहू असे प्रतिपादन शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी केले.

याप्रसंगी महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शनाताई त्रिगुनाईत, शहर संघटक श्रीकांत पुजारी, महिला आघाडी शहरप्रमुख श्रुतीताई नाझीरकर, सुरेखाताई पाटील, राजश्रीताई माने, उपशहर प्रमुख सचिन थोरात, संजय डोंगरे, सुधीर कुरुमकर, विकी माने, प्रमोद प्रभुणे, गौरव साईनकर, गणेश काची, शहर संघटक आकाश रेणूसे, विभाग प्रमुख नितीन लगस, निलेश जगताप, महेंद्र जोशी, मयूर पानसरे, उद्धव कांबळे, मार्तंड धंधुके, सुहास कांबळे, प्रणव थोरात, गडकरी सर यांच्यासह पुणे शहरातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1