PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | आजपासून केली जाणार जप्तीची कारवाई

HomeपुणेBreaking News

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | आजपासून केली जाणार जप्तीची कारवाई

गणेश मुळे Apr 29, 2024 6:53 AM

Madhav Jagtap PMC | महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागचा अतिरिक्त पदभार उपयुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!
PMC 32 Villages property tax | ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा | मात्र महापालिकेला हक्काच्या उत्पन्नावर सोडावे लागणार पाणी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
Kharadi Citizens gifted Jalparni (Water Lilies) to PMC Deputy Commissioner!  

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | आजपासून केली जाणार जप्तीची कारवाई

PMC Pune Encroachment Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अतिक्रमण विभागाच्या (PMC Encroachment Department) वतीने बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. असे वाहन रस्त्यावर किंवा फुटपाथवर आढळल्यास गाडी जप्त केली जाईल. ती गाडी सोडवण्यासाठी गाडी मालकाला 5 हजार पासून ते 25 हजार पर्यंत दंड होऊ शकेल. अतिक्रमण विभागाकडून अशा लोकांना नोटीस देखील पाठवणे सुरु केले आहे. त्यानुसार 700 वाहनांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे पोलीस आणि अतिक्रमण विभागाकडून आजपासून जप्तीची कारवाई केली जाणार आहे.  अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिका हद्दीत रस्ता, पदपथावर इत्यादी ठिकाणी बंद / बेवारस वाहने, पडीक नादुरुस्त वाहने आढळ होत आहेत. अशी वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे तसेच सदर वाहने जागेवरून न हलविल्यामुळे कचरा तयार होऊन दुर्गंधी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी रस्त्यावरील बंद / बेवारस वाहने उचलणेची कारवाई करणेत आली आहे. रस्त्यावरील  बंद / बेवारस वाहनांबाबत नागरिकांच्या देखील तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत.  त्यामुळे अशी वाहने पुणे महानगरपालिकेकडील क्षेत्रिय कार्यालयामार्फत कारवाई करून जप्त करणेत येणार आहेत.  (PMC Pune News)

-जप्त केलेली वाहनांसाठी  रिमुव्हल चार्जेस खालील प्रमाणे –

1. अवजड वाहनासाठी (प्रवासी बस, ट्रक इ.) = २५,०००/-
2. हलकी वाहने (१० टना पर्यंत) = २०,०००/-
3. चार चाकी वाहने (कार, जीप इ.) = १५,०००/-
4. तीन चाकी (रिक्षा, टेम्पो) = १०,०००/-
5. दुचाकी (स्वयंचलित) र= ५०००/-

– 700 वाहनांना नोटिसा

अतिक्रमण विभागाच्या माहितीनुसार  संबंधित वाहनमालक आपले वाहन १ महिन्याचे कालावधीमध्ये सोडवून घेऊ शकेल. सदर वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून नोटीस लावण्यात येणार असून याकरिता ७ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. संबंधित वाहनधारकांनी ७ दिवसांच्या मुदतीत वाहन काढून न घेतल्यास सदर वाहनावर पुणे महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.  त्यानुसार शहरात 700 वाहनांना नोटीस लावण्यात आल्या आहेत. 29 एप्रिल पासून जप्तीची कारवाई केली जाणार असल्याने आपली वाहने काढून घेण्याचे आवाहन  अतिक्रमण विभागाकडून करण्यात आले आहे.
—–