PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न! | कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे उपायुक्त माधव जगताप यांचे आश्वासन 

Homeadministrative

PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न! | कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे उपायुक्त माधव जगताप यांचे आश्वासन 

Ganesh Kumar Mule Sep 06, 2024 9:01 PM

PMC Women Employees | पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महाभोंडल्याचे पी एम सी एम्प्लॉईज युनियन तर्फे आयोजन
PMC Employees Suspension | कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याआधी त्यांना प्राथमिक सुविधा द्या | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी
Pune PMC Canteen | महापालिका कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार हक्काचे उपहार गृह! | पीएमसी एम्प्लॉईज युनियन च्या मागणीला यश | सेवकांसाठी असणाऱ्या उपहारगृहास आयुक्तांची मान्यता 

PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न! | कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे उपायुक्त माधव जगताप यांचे आश्वासन

 

PMC Employees Union – (The Karbhari News Service) – पीएमसी एम्प्लॉईज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा  ५ सप्टेंबर  रोजी  पार पडली. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सेवकांचे प्रलंबित विषय मांडण्यात आले. याबाबत उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtp PMC) यांनी प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत मदत करण्याचे आश्वासन दिले. (Pune Municipal Corporation – PMC)

सभेची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करुन  उप आयुक्त कर आकारणी व कर संकलन प्रमुख  माधव जगताप तसेच कैलास वाळेकर उपमुख्यलेखा वित्त अधिकारी, कार्याध्यक्ष पूजा देशमुख, वंदना साळवे,संदीप खेडेकर, अभय गीते यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. सभेच्या अध्यक्ष स्थानी  बजरंग पोखरकर हे होते. ज्ञात अज्ञात दिवंगत सेवकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (Pune PMC News)

२००५ नंतर रुजू झालेल्या सेवकांना सी एच एस योजना सुरु झाली पाहिजे. पद स्किप बाबत  मुख्य सभेचा ठराव लवकरात लवकर करावा. सर्व संवर्गातील बढती प्रक्रिया लवकरात लवकर करावी. ज्या प्रमाणे आजी/माजी सैनिकांना वस्तू खरेदीसाठी कॅन्टीन सुविधा आहे त्याप्रमाणे महापालिका सेवक व अधिकारी यांना कॅन्टीन सुविधा उपलब्ध करावी. निलंबित सेवकांना त्वरित कामावर घ्यावे. मनपा भवन येथे उपहार गृह सुरु करावे. मनपातील रिक्त जागा त्वरित भराव्यात. या सर्व मागण्या  यावेळी अध्यक्षांनी मांडल्या.


उप आयुक्त  माधव जगताप यांनी महापालिका आयुक्त यांचे बरोबर बैठक लाऊन अध्यक्ष यांनी केलेल्या मागणीवर चर्चा करून सेवकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी कसे लागतील यासाठी मी मदत करेल असे सांगितले.

कैलास वाळेकर  यांनी सांगितले की सर्वांना सोबत घेऊन युनियन काम करते म्हणून आज आपल्या समोर चांगल्या प्रकारे अहवाल मांडता आला मला जेवढं शक्य आहे तेवढी मी मदत तर करणारच आहे. असे सांगुन शुभेच्छा दिल्या.

एल एस जी डी मध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल् प्रज्ञा पाटील व अभिजीत काटकर यांचा सत्कार करून गौरवण्यात आले. विशेष सन्मान म्हणून  राजेश कामठे, अशोक नटे व विजय इंगळे यांचा सन्मान केला . सर्वसाधारण सभेचा वृत्तांत  वाहिद आ सय्यद यांनी वाचून कायम केला. संजीव मोरे सचिव यांनी सन 2023- 24 च्या आर्थिक अहवालास मंजुरी देण्याचे मागणी सर्व साधारण सभेला केली त्यास एकमताने मंजुरी दिली. अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी पुणे मनपा गणेश मंडळास ११०००/ रू देण्याचे जाहीर केले. त्यास सा सर्वांनी सहमती दिली. जिजाभाऊ दातीर यांनी सन २०२३- २४ मध्ये युनियनने केलेल्या कामांची माहिती देण्यात आली व कामकाजाचा अहवाल मंजूर करण्यात आला.कार्यकारी मंडळावरील रिक्त असलेल्या जागासाठी ज्या सेवकांनी अर्ज केले होते, त्यांची संक्षिप्त माहिती  चेतन गरुड यांनी सभेपुढे दिली. त्यास अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांची नावे जाहीर केली.

जनरल सेक्रेटरी म्हणून श्रीधरभाई चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली. महिला कार्याध्यक्ष म्हणून  पल्लवी कुलथे यांची निवड एकमताने करण्यात आली,
वाहिद सय्यद यांची खजिनदार पदासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली .  उपाध्यक्ष म्हणून छाया सूर्यवंशी, अमृता इंगवले, शशिकला निरवने, दिपावली गायकवाड तसेच राहुल सकट,जयराम भुजबळ ,मंदार कारंजे ,चेतन गरुड यांची युनियन उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारी सदस्य म्हणून जिजाभाऊ दातीर ,राजू घुले,सतिश घुगे, सुभाष नागवडे , सुनिता मोरे ,सोनाली बनकर,अनुराधा जगताप यांची नव्याने निवड करण्यात आली . सर्वांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

सूत्र संचालन राजू ढाकणे यांनी केले. आभार  अमृता इंगवले यांनी केले. या सभेसाठी गिरीश बहिरट, विशाल ठोंबरे ,राजू ढाकने, गणेश मांजरे ,जालिंदर खरमाटे, दीपक घोडके,अविनाश गायगवळी, राजेंद्र जाधव ,सचिन नलावडे ,रघुनंदन भुजबळ,भाऊ पाटील अजित गारळे,सुनील मधे, नामदेव भोईर, संतोष रेंगडे,वंदना साळवे ,संगीता बांगर,वंदना पाटसकर ,निवांत ओव्हाळ , गुजराथी, सुभाष हंडाळ, सेवक प्रियांका होडे यांनी सभेच छान नियोजन केल्याबद्दल अद्यक्षांनी त्यांचा सत्कार केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0