PMC Employees Transfers | लेखनिकी संवर्गातील 286 कर्मचाऱ्यांच्या होणार नियतकालिक बदल्या 

HomeपुणेBreaking News

PMC Employees Transfers | लेखनिकी संवर्गातील 286 कर्मचाऱ्यांच्या होणार नियतकालिक बदल्या 

गणेश मुळे Jul 02, 2024 4:11 PM

Ganesh Visarjan Holiday | गणेश विसर्जनाच्या सुट्टीबाबत पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी
Deputy Commissioner Pratibha Patil has the additional charge of PMC Chief Security Officer!
 Important news for Pune Municipal Corporation employees |   Circular issued regarding the payment of the third installment of the 7th Pay Commission!

PMC Employees Transfers | लेखनिकी संवर्गातील 286 कर्मचाऱ्यांच्या होणार नियतकालिक बदल्या

| शुक्रवारी केली जाणार कार्यवाही

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील (PMC Pune) लेखनिकी संवर्गातील लिपिक टंकलेखक पदावरील 286 कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या केल्या जाणार आहेत. याबाबतचे आदेश उपायुक्त प्रतिभा पाटील (Pratibha Patil PMC)  यांनी जारी केले आहेत. (Pune PMC News)
महापालिका कर्मचाऱ्यांना एका खात्यात तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यानुसार लेखनिकी संवर्गातील 286 लिपिक टंकलेखक यांच्या नियतकालिक बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्या अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या अध्यक्षते खाली होणार आहेत. यासाठी महापालिका आयुक्तांची देखील मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार शुक्रवारी या बदल्यावर कार्यवाही केली जाणार आहे. जुना जीबी हॉल येथे कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी 11 ते 2 या कालावधीत 1 ते 150 अणुक्रमांकाच्या कर्मचाऱ्यांच्या तर दुपारी 3 ते 6 या दुसऱ्या सत्रात 151 ते 286 या अणुक्रमांकाच्या बदल्या केल्या जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांची यादी येथे पहा :