PMC Employees Transfers | 8 उप अधीक्षक आणि 100 वरिष्ठ लिपिकांच्या होणार नियतकालिक बदल्या
| येत्या मंगळवारी केली जाणार कार्यवाही
Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील (PMC Pune) प्रशासकीय संवर्गातील वरिष्ठ लिपिक पदावरील 100 कर्मचाऱ्यांच्या आणि 8 उप अधीक्षक नियतकालिक बदल्या केल्या जाणार आहेत. याबाबतचे आदेश उपायुक्त प्रतिभा पाटील (Pratibha Patil PMC) यांनी जारी केले आहेत. (Pune PMC News)
महापालिका कर्मचाऱ्यांना एका खात्यात तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यानुसार प्रशासकीय संवर्गातील 8 उप अधीक्षक आणि 100 वरिष्ठ लिपिक यांच्या नियतकालिक बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्या अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या अध्यक्षते खाली होणार आहेत. यासाठी महापालिका आयुक्तांची देखील मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार येत्या मंगळवारी या बदल्यावर कार्यवाही केली जाणार आहे. जुना जीबी हॉल येथे कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता उप अधीक्षक पदाच्या बदल्याचे कामकाज तर 11:30 वाजता वरिष्ठ लिपिकांच्या बदल्यांचे कामकाज होणार आहे.
COMMENTS