PMC Employees Retirement | पुणे महापालिकेचे (PMC) ४१ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Retirement | पुणे महापालिकेचे (PMC) ४१ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

गणेश मुळे Apr 30, 2024 3:07 PM

Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme | नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात
Reliance Jio | PMC | गेल्या 5 वर्षांपासून जिओ कंपनी महापालिकेला लावतेय चुना! | पथ विभागानेच दिली कबुली 
PMC Employees | Strike | सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम सुरु! | क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून चांगला प्रतिसाद

PMC Employees Retirement | पुणे महापालिकेचे (PMC) ४१ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – एप्रिल, 2024 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) ४१ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभाग (PMC Labour Welfare Department) च्या वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डॉ. मिलिंद वाकोडे (Dr.Milind Vakode), सल्लागार, केंद्रीय मधमाशी पालन व प्रशिक्षण केंद्र, पुणे हे उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली व सर्वांनी मतदान करावे असे आवाहन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. तदनंतर शसेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. मिलिंद वाकोडे यांनी निवृत्त सेवकांना मार्गदशनपर बोलताना , आपण आज सेवानिवृत्त होत नाहीत तर आपली दुसरी इनिंग सुरू होत आहे, आपण आपल्या आवडत्या कामात व्यस्त राहिले पाहिजे, आपल्या जोडीदाराला पेन्शन मिळेल अशी गुंतवणूक करा, अपल्या कडे बेरोजगारी वाढत आहे त्यामुळे मधुमक्षिका पालन हा व्यवसाय करावा त्यामध्ये भांडवल कमी व उत्पन्न जास्त असते असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विशाल कदम यांनी केले.