PMC Employees Promotion | लेखनिकी संवर्गातील २५० कर्मचाऱ्यांना लवकरच पदोन्नती! 

PMC Bhavan

Homeadministrative

PMC Employees Promotion | लेखनिकी संवर्गातील २५० कर्मचाऱ्यांना लवकरच पदोन्नती! 

Ganesh Kumar Mule Mar 05, 2025 8:34 PM

PMC Pune Employees Workshop | महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यशाळेत विचारमंथन
PMC Pune Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी उद्या कार्यशाळा | प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त राहणार उपस्थित
Ahilyadevi Holkar Jayanti | पी एम सी एम्प्लॉइज युनियन कार्यालयामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्राचे अनावरण

PMC Employees Promotion | लेखनिकी संवर्गातील २५० कर्मचाऱ्यांना लवकरच पदोन्नती!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – लेखनिकी  संवर्गातील १५०  वरिष्ठ लिपिक व १०० उपअधीक्षक  यांच्या पदोन्नती डीपीसी अहवाल ला आयुक्त यांनी मान्यता दिली आहे. त्या मुळे अनेक वर्ष पदोन्नती च्या प्रतिक्षेत असलेल्या सेवकानी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत आदेश लवकरच संबधित विभागाकडून काढण्यात येणार आहेत. अशी माहिती  पीएमसी इम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

याबाबत पोखरकर यांनी सांगितले कि, पदोन्नतीच्या जागा रिक्त असल्याने प्रशासनास काम करणे अडचणीचे होते. त्या मुळे सर्व च्या सर्व पदोन्नतीच्या जागा भरणेबाबत संघटना आग्रही आहे. त्यामधील लेखनिक वर्गातील साधारण आता २५० लोकांना पदोन्नती दिली जाईल. पुढील टप्यात प्रतिक्षा यादी मधील सेवकाना जशा जागा रिक्त होतील तशी पदोन्नती दिली जाणार आहे,. रिक्त जागेच्या दिड पट प्रतीक्षा यादी लावण्याची युनियनची मागणी होती. ती डीपीसी समिती मान्य केली आहे. असेही पोखरकर यांनी सांगितले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: