PMC Employees | श्रेणीत बदल होऊन ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ६० व्या वर्षापर्यंत महापालिका सेवेत काम करण्याची संधी!

Homeadministrative

PMC Employees | श्रेणीत बदल होऊन ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ६० व्या वर्षापर्यंत महापालिका सेवेत काम करण्याची संधी!

Ganesh Kumar Mule Mar 06, 2026 3:41 PM

Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth | रहाळकर राममंदिरात काँग्रेसने केली महाआरती, भजन, प्रसादाचे वाटप
PMC Ward 35 – Suncity Manik Bagh | प्रभाग क्रमांक ३५ – सनसिटी माणिक बाग  | प्रभागाची व्याप्ती आणि राचा सविस्तर जाणून घ्या! 
8th Pay Commission | 8वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडूनच आला हा संदेश! |   कोणता सिग्नल मिळाला ते जाणून घ्या

PMC Employees | श्रेणीत बदल होऊन ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ६० व्या वर्षापर्यंत महापालिका सेवेत काम करण्याची संधी!

 

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – सेवाप्रवेश नियमावली महाराष्ट्र शासनाने मंजूर करताना महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या श्रेणीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रेणी-४ मध्ये असणारी पदे हि श्रेणी-३ मध्ये दर्शविण्यात आलेली आहेत. त्यामुळे अशा पदांवर कार्यरत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाच्या श्रेणी-३ प्रमाणे वय वर्षे ५८ पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त करण्यात आलेले आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार आता ५८ च्या ऐवजी ६० व्या वर्षी सेवानिवृत्त केले जाणार आहे. तसेच ५८  व्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना सेवेत माघारी बोलावून ६० व्या वर्षापर्यंत काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच वेतनवाढ देखील काल्पनिकरित्या देण्यात येणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून विधी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (PMC Law Committee)

महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांचे सेवा प्रवेश नियमांना “पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ ला  मंजुरी दिलेली आहे. त्याप्रमाणे  सेवाप्रवेश नियम हे  पुणे महानगरपालिका स्तरावर लागू करण्यात आलेले आहेत. पुणे महानगरपालिका अग्निशमन सेवेतील विविध पदांसाठी २०२२ नुसार सेवाप्रवेश नियम लागू करण्यात आलेले आहेत.

\ सेवाप्रवेश नियमावली महाराष्ट्र शासनाने मंजूर करताना महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या श्रेणीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रेणी-४ मध्ये असणारी पदे हि श्रेणी-३ मध्ये दर्शविण्यात आलेली आहेत. त्यामुळे अशा पदांवर कार्यरत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाच्या श्रेणी-३ प्रमाणे वय वर्षे ५८ पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त करणेची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

अशी कार्यवाही केल्याने त्यापैकी प्रमुख अग्निशमन विमोचक / तांडेल या पदावरील काही सेवकांनी उच्च न्यायालय येथे व त्यानंतर  सर्वोच्च न्यायालय येथे याचिका दाखल केलेली होती. याचिकेच्या अनुषंगाने  सर्वोच्च न्यायालयाने ०३/०३/२०२५ रोजी अंतिम आदेश पारित केलेले होते. या आदेशांमध्ये  सर्वोच्च न्यायालयाने प्रमुख अग्निशमन विमोचक / तांडेल या पदावरील सेवकांना त्यांचे वय वर्ष ६० पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त करण्यात यावे. असे आदेश पारित केलेले आहेत. यासोबतच कोणत्याही कर्मचाऱ्यास त्याचे वयास ५८ वर्ष पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त केलेले असल्यास व त्यास लाभ देण्याचे नाकारले असल्यास असा वैयक्तिक प्रकरणांचा आढावा घेण्यात यावा, अशा प्रकरणी ज्या सेवकांनी वयाची ६० वर्ष पूर्ण केलेली नसतील व ते सेवा देऊ इच्छित असतील अशा वेळी महानगरपालिकेस शक्य असल्यस अशा सेवकांस पुन्हा सेवेत परत घ्यावे, असे नमूद आहे. यानुसार आता महापालिका प्रशासन अमल करणार आहे.

| कर्मचाऱ्यांना हे होतील लाभ

१. श्रेणी ४ मधील पदांवर ज्या कर्मचाऱ्यांची सरळसेवेने किंवा पदोन्नतीने नियुक्ती झालेली आहे आणि ते कर्मचारी त्याच म्हणजे तत्कालीन श्रेणी-४ च्या पदावर सध्या कार्यरत आहेत, अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाची श्रेणी- ४ गृहीत धरून त्यांना पुणे महानगरपालिका सेवाविनियमातील नियम ६६ मधील कनिष्ठ सेवेबाबतच्या तरतुदीनुसार त्यांचे वय वर्षे ६० पूर्ण होतात तेव्हा सेवानिवृत्त केले जाणार आहे.

२. श्रेणीमध्ये बदल होऊन ज्या कर्मचाऱ्यांना वय वर्ष ५८ पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त करण्यात आलेले आहे आणि आता त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झालेली नाहीत व पुन्हा सेवेत रुजू होण्याची इच्छा व शारीरिक पात्रता आहे, अशा कर्मचाऱ्यांचे लेखी अर्ज घेऊन व त्यांची शारीरिक पात्रता तपासून त्यांना सेवेत रुजू करून घेऊन वय वर्षे ६० होताच त्यांना सेवेतून सेवानिवृत्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

३. ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाची श्रेणी-४ मधून श्रेणी-३ बदल झाल्याने वय वर्षे ५८ नुसार सेवानिवृत्त केलेले आहे आणि आता त्यांचे वय ६० वर्षे पूर्ण झालेले आहे अशा कर्मचाऱ्यांना जणू काही त्या सेवकाने त्याच्या वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत सेवा केलेली आहे, असे गृहीत धरून त्यांना सेवानिवृत्तीचे वय ६० पूर्ण होईपर्यंत देय होत असलेल्या वेतनवाढी काल्पनिकरित्या मंजूर करणे आणि अशा वेतनवाढीचा कोणताही प्रत्यक्ष लाभ न देता फक्त सेवा निवृत्तीवेतन निश्चित करणेसाठी अंतिम मूळ वेतन निश्चित करणे करिता गृहित धरले जाईल.

४. जे कर्मचारी  मंजूर सेवा प्रवेश नियम लागू झाल्याने श्रेणी-३ मध्ये दर्शविलेल्या पदावर सरळसेवेने किंवा पदोन्नतीने नियुक्त झालेले असतील अशा कर्मचाऱ्यांना त्या पदाची  शासन निर्णयाने मंजूर सेवाप्रवेश नियमातील श्रेणी – ३ कायम ठेऊन त्याप्रमाणे त्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे निश्चित करणे व त्याप्रमाणे अशा कर्मचाऱ्यांना त्यांची वय वर्षे ५८ पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त केले जाईल.

५. याव्यतिरिक्त भविष्यात ज्या पदांबाबत असा प्रश्न निर्माण होईल त्यापदांबाबत असणारी वस्तुस्थिती तपासून त्यानुसार अंतिम निर्णय महापालिका आयुक्त करतील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: