PMC Standing Committee | आम्ही सभागृहात येणार हे माहीत असताना आधी टेंडर प्रक्रिया केलीच कशी? | स्थायी समितीत विरोधी बाकावरील सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

Homeadministrative

PMC Standing Committee | आम्ही सभागृहात येणार हे माहीत असताना आधी टेंडर प्रक्रिया केलीच कशी? | स्थायी समितीत विरोधी बाकावरील सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

Ganesh Kumar Mule Mar 06, 2026 1:24 PM

ITI Training Center Yerawada |  MLA Sunil Tingre |  ITI Training Center to be set up at Yerawada
Voter List | मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक | नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत | जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
Pune PMC News | आचारसंहिता संपल्यावर एकत्रित तीन वर्षाचे महर्षी वाल्मिकी पुरस्काराचे वितरण! | महापालिका आयुक्तांचे नगरसचिव विभागाला आदेश

PMC Standing Committee | आम्ही सभागृहात येणार हे माहीत असताना आधी टेंडर प्रक्रिया केलीच कशी?

| स्थायी समितीत विरोधी बाकावरील सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – कालच्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी बाकावरील नगरसेवक चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले. काही टेंडर प्रक्रियेवर आक्षेप आल्यानंतर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला कि, आम्ही सभागृहात येणार हे तुम्हाला माहीत होते. तरीही आधीच टेंडर प्रक्रिया का लावली? असे प्रश्न विचारत प्रशासनाला धारेवर धरले. (Pune PMC News)

महापालिकेच्या हद्दीतील समाविष्ट गावांमधील वृक्षगणना करण्यासाठीच्या ३५ कोटी रुपये खर्चाची निविदा स्थायी समिती समोर मंजुरीसाठी आली होती. मात्र यावर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे निविदेला स्थायी समितीने स्थगिती दिली आहे. वृक्षगणनेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्याची आवश्यकता नाही. महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, खासगी संस्थांची मदत घेऊन कमी खर्चात हे काम करता येईल, अशी भूमिका स्थायी समितीच्या सदस्यांनी मांडली. तसेच यासाठी निविदा सादर केलेल्या कंपनीबाबतचे आक्षेप लक्षात घेता या निविदेला स्थगिती देण्यात आली आहे.

या विषयावर चर्चा होत असतानाच काँग्रेस चे नगरसेवक प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी च्या अमोल बालवडकर यांनी या टेंडर प्रक्रियेवर आक्षेप घेतला. तसेच प्रश्न उपस्थित केला की ही प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू करण्यात आली. आम्ही काही काळाने सभागृहात येणार होतोच, मग एवढी घाई का केली? आम्ही आल्यानंतर तपासून प्रक्रिया करता आली असती.

त्याचप्रमाणे काही काळापूर्वी सुरक्षा रक्षक घेण्याचे टेंडर देखील मान्य केले आहे. त्यानंतर वाढीव सुरक्षा रक्षक घेण्याचा प्रस्ताव आणण्यात आला होता. पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाने नुकतेच १५६५ बहुउद्देशीय कामगार घेतले आहेत. जवळपास १४० कोटींचे ही निविदा होती. ३ कंपन्यांना १ सप्टेंबर पासून याचे काम देखील सोपवण्यात आले आहे. दरम्यान यात अजून ३५० कामगारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खर्च जरी वाढला नसला तरी निविदेचा कालावधी मात्र कमी करण्यात आला आहे. कालावधी हा ३६ महिन्यावरून २५ महिने इतका कमी करण्यात आला आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मुख्य सभेने मान्यता दिली आहे. यावर देखील आक्षेप घेण्यात आला.

आता सदस्यांनी याबाबत प्रशासनाला याचा सविस्तर अहवाल मागवला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0