PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा २९ ऑक्टोबर ला सन्मान!
PMC Employees and Officers – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकारी / सेवकांच्या पाल्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता दहावी व बारावी) परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अशा उत्तीर्ण सर्व पाल्यांचे महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे (PMC Labour Welfare Fund) २९ ऑक्टोबर ला सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांनी दिली. (PMC Labour Welfare Department)
माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ वी) परीक्षांमध्ये ६५% गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सर्व पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार समारंभ प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार कामगार कल्याण निधीच्या ज्या सभासद सेवकांच्या पाल्यांनी ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, अशा पाल्यांचा सन्मान केला जातो. यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सामग्री दिली जाते. दरम्यान यासाठी अर्ज करण्यासाठी कालावधी दिला होता. त्यानुसार प्रशासनाने याची सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे. यात पात्र ठरलेल्या १६७ पाल्यांचा सन्मान केला जाणार आहे. यात १० वि चे १२८ तर १२ वी च्या ३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बक्षीस म्हणून या विद्यार्थ्यांना हॅवर सॅक आणि पेन ड्राइव्ह दिला जाणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करियर बाबत मार्गदर्शन करण्यासाठी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी के सी कारकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महापालिकेच्या जुन्या जीबी हॉल मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार कल्याण विभागाने केले आहे.

COMMENTS