PMC | PMPML | महापालिकेच्या जागा पीएमपीएमएल ला देण्याची मागणी
Mohan Joshi Congress – (The Karbhari News Service) – सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ला बस स्थानके आणि बसगाड्या पार्क करण्यासाठी महापालिकेच्या जागा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्तांकडे आज (बुधवारी) केली. (Pune News)
सुमारे १लाख४३हजार चौरस मीटर क्षेत्रफळ जागा महामेट्रो ला देण्याचे घाटत असल्याचे समजते. महापालिकेची जागा परस्पर महामेट्रोला देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.
पीएमपीएमएलच्या बस थांब्यात नजीकच्या काळात १२०० गाड्यांची भर पडणार आहे. पीएमपीला बस स्थानके आणि रात्रीच्या वेळी बसगाड्यांचे पार्किंग यासाठी जागा लागणार आहे. पीएमपीच्या सार्वजानिक बससेवेचा लाभ दररोज ११ लाख प्रवासी घेत असतात. अशा या महत्वाच्या बससेवेसाठी प्राधान्याने जागा देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात सुनिल मलके, अविनाश बागवे, प्रथमेश आबनावे, मुख्तार शेख, आयुब पठाण, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, गौरव बोराडे, सुरेश कांबळे, ॲड. प्रविण करपे, ॲड.साहिल राऊत, विनोद रणपिसे, मिलिंद पोकळे, अमोल धर्मावत, ॲड.विजय त्रिकोणे, विकास सुपनार, मेधशाम धर्मावत, सुनिल बावकर, हुसेन शेख, दयानंद आडागळे, गोपाळ धनगर आदी सहभागी होते.

COMMENTS