HomeपुणेBreaking News

PMC Employees Agitation | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनपा भवन समोर निदर्शने | मागण्यावर ८ दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेणार – अतिरिक्त आयुक्त 

गणेश मुळे Jul 18, 2024 3:00 PM

PMC Employees Transfer | पुणे महापालिका कर्मचाऱ्याची मंत्रालयात बदली! | राज्य सरकार अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप
Extension to apply for PMC Gunvant Kamgar Award to Pune Municipal Corporation (PMC) Employees
PMC Employees Retirement | पुणे महापालिकेचे (PMC) ४१ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!

PMC Employees Agitation | पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या वतीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनपा भवन समोर निदर्शने

| मागण्यावर ८ दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेणार – अतिरिक्त आयुक्त

 

PMC Employees Union – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांच्या (PMC Employees) प्रलंबित प्रश्नाबाबत आज गुरुवार रोजी दुपारी  पुणे मनपा मुख्य इमारतीसमोर (PMC Main Building) भव्य निदर्शन तथा आंदोलन करण्यात आले. याआंदोलनात हजारो मनपा सेवकांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद देत प्रशासनाला धारेवर धरले. (Pune Municipal Corporation Employees Agitation)

 

 

यामध्ये मुख्यत:  राज्य शासनाची ग्रामपंचायतीकडील नवनिर्मित पदांना कोणतीही मान्यता नसताना तसेच ग्रामपंचायतीमधील आकृतिबंधामध्ये वरिष्ठ लिपिक या पदाची कोणीतीही तरतूद नसताना महानगरपालिकेच्या मूळ सेवाज्येष्ठता यादीमध्ये व आस्थापनेवर ग्रामपंचायतच्या 34 वरिष्ठ लिपीकांचा समावेशन करण्यात आलेले आहे. त्यांची कोणतीही अर्हता तपासली गेली नाही. विभागीय परीक्षा पास नाहीत, त्यांचा लिपिक या पादावर 3 वर्ष काम केल्याचा अनुभव नाही. तरीही मनपात वरिष्ठ लिपीक पदी नियुक्ती दिली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या मूळ सेवकांमध्ये तीव्र असंतोष असून प्राधान्याने मूळ सेवकांना प्रथम पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. (Pune PMC News)

तसेच वरिष्ठ लिपिक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, उप कामगार अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता, सहाय्यक महापालिका आयुक्त या संवर्गातील पदांना देखील पदोन्नती दिली जात नाही. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. पद्स्कीप चा प्रस्ताव शासनदरबारी तत्कालीन आयुक्त यांनी पाठवलेले असतांना त्या वर आता समिती नेमून दिरंगाई का केली जाते. त्या साठी लागणारा मुख्यसभेचा ठराव पारीत करून तो शासनास पाठवावा तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर पदोन्नतीचा स्तर कमी करून लेखनिकि संवर्गाची पदसंरचना व वेतनश्रेणी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

याचप्रमाणे सन २००५ नंतर पुणे मनपा सेवेत रुजू झालेल्या सेवकांना सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय अंशदायी सहाय्य योजना (CHS) सुरु ठेवण्याची मागणी करण्यात आली. सेवकांचे कोणत्याही प्रकारचे खुलासे न मागवता केलेले तूर्तातूर्त निलंबन प्राधान्याने रद्द करण्यात यावे. वर्ग 4 मधील अनुकंपा वरील सेवकांना वर्ग 3 मध्ये तात्काळ घेण्यात यावे अशी आग्रही भूमिका अध्यक्ष यांनी मांडली.

या आंदोलनामध्ये वरील मागण्याचे निवेदन  पृथ्वीराज बी पी ,अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांना देण्यात आलेले आहे.  मागण्यावर ८ दिवसामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांनी दिले.

निदर्शनामध्ये पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर, जनरल सेक्रेटरी  बापू पवार, सह सेक्रेटरी  राजू ढाकणे, गिरीष बहिरट , गणेश मांजरे, सोमनाथ गोरे, विशाल ठोंबरे, कार्याद्यक्ष श्रीमती पूजा देशमुख यांची सेवकांच्या मागणी बाबत भाषणे झाली. सदर निदर्शनाला मोठ्या संख्येने मनपा सेवक उपस्थित होते.


प्रशासनाने सेवकांच्या मागण्या बाबत लवकरात लवकर निंर्णय न घेतल्यास मोठं आंदोलन छेडणार. वेळ पडल्यास लेखणी बंद करणार. आताचे प्रशासक / आयुक्त  या बाबत लवकर धोरणात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

  • बजरंग पोखरकर, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन