Courses for PMC Employees | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना विविध अभ्यासक्रम करण्याची संधी! | वेतनवाढ आणि पदोन्नती साठी होणार फायदा!
Courses for PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) विविध अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून (All India Institute of Local Self Government) उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षक, एल.एस.जी.डी., एल. जी. एस. इस्टेट मॅनेजमेंट, डी. एल. जी. एफ. एम. असे अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत. 15 जून पर्यंत प्रवेश घेण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्याने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि पदोन्नतीसाठी फायदा होतो. याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्याचे आदेश मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून राबवण्यात येणारे स्वच्छता निरीक्षक एल. एस. जी. डी., एल. जी.एस., इस्टेट मॅनेजमेंट, डी.एल. जी. एफ.एम. हे अभ्यासक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी संस्थेने डिझाईन केलेले अभ्यासक्रम आहेत. शासनाने कार्यान्वित केलेल्या विविध योजना राबविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. त्यामुळे संस्थेने खास महानगरपालिकामधील कर्मचाऱ्यांसा