PMC Employees Pension | पेन्शन प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी सेवापुस्तक ऑनलाईन करा! | स्थायी समिती अध्यक्ष यांचे आदेश

Homeadministrative

PMC Employees Pension | पेन्शन प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी सेवापुस्तक ऑनलाईन करा! | स्थायी समिती अध्यक्ष यांचे आदेश

Ganesh Kumar Mule Jul 24, 2026 10:54 AM

7th Pay Commission Latest News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!
PMC Officers Promotion | अखेर अभियांत्रिकी संवर्गातील अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) पदी पदोन्नती! 
PMC Employees Promotion |  लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नती  | अर्ज करण्यासाठी १ महिन्याची मुदतवाढ 

PMC Employees Pension | पेन्शन प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी सेवापुस्तक ऑनलाईन करा! | स्थायी समिती अध्यक्ष यांचे आदेश

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीने पेन्शन मिळावी

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service)– पुणे महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू होण्यासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागत असल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत ऐरणीवर आला. या विलंबाला आळा घालण्यासाठी आणि पेन्शन प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये विशेषतः सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके ऑनलाईन करण्यावर भर देण्यात आला आहे. (Shrinath Bhimale PMC Standing Committee)

बैठकीत सदस्य रुपाली धाडवे यांनी पेन्शन प्रकरणातील होणाऱ्या दिरंगाईचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले.

ते म्हणाले, “कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर तत्काळ पेन्शनचा लाभ मिळत नाही. यासाठी त्यांना अनेक खेटे घालावे लागतात. ही प्रक्रिया जलद करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके ऑनलाईन करण्याची प्रक्रिया पूर्ण करा. सेवापुस्तक डिजिटल झाल्यास कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी फार वेळ वाया जाणार नाही आणि पेन्शन प्रकरणेही लवकर मार्गी लागतील.”

समिती अध्यक्षांनी यावेळी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजीही व्यक्त केली. “कर्मचाऱ्यांच्या पेन्शन लागू न झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे वारंवार येत असतात. ही अत्यंत गंभीर बाब आहे. वर्षानुवर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या हक्काच्या पेन्शनसाठी वणवण करावी लागत असेल, तर ते चुकीचे आहे,” असे ते म्हणाले.

पेन्शनशी संबंधित गुंतागुंतीची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी मुख्य लेखापरीक्षक विभागाला दिले.

“प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी ऑब्जेक्शन घेतात”
बैठकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अध्यक्षांनी मांडला. राज्य सरकारचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर महापालिकेत येतात आणि पेन्शन मंजूर करताना ते विविध आक्षेप घेतात, असा आरोप त्यांनी केला.

“बाहेरून आलेले अधिकारी इथे येऊन ऑब्जेक्शन घेत बसतात. त्यामुळे पुणे महापालिकेत 30-35 वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो आहे. अशा प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा,” अशा शब्दांत श्रीनाथ भिमाले यांनी संताप व्यक्त केला.

काय आहेत मुख्य सूचना?
1. सेवापुस्तके ऑनलाईन: सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके तातडीने डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून द्यावीत. त्यामुळे फाईलींची देवाणघेवाण टळून वेळेची बचत होईल.
2. प्रकरणे जलद निकाली: पेन्शनशी संबंधित प्रलंबित आणि गुंतागुंतीची प्रकरणे विशेष मोहीम राबवून निकाली काढावीत.
3. तक्रारींचे निवारण: पेन्शन न मिळाल्याबत येणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करावी.

स्थायी समिती अध्यक्षांनी दिलेल्या या सूचनांनंतर प्रशासनाकडून आता सेवापुस्तके ऑनलाईन करण्याची प्रक्रिया आणि पेन्शन विभागातील कामकाजाचा वेग वाढविला जाणार का, याकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: